23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeठळक बातम्या*आमदार अभिमन्यू पवार यांच्या चिरंजीवाचा साक्षगंध*

*आमदार अभिमन्यू पवार यांच्या चिरंजीवाचा साक्षगंध*

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी

आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीवाच्या साक्षगंध सोहळ्यास 

उपस्थित राहून उभयतांना दिल्या शुभेच्छा

लातूर प्रतिनिधी ७ जूलै २०२२: 

  राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि. ७ जुलै रोजी दुपारी लातूर शहरातील औसा रोड येथील  थोरमोठे पाटील लॉन्स येथे आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या चैताली यांच्या साक्षगंध सोहळ्यास उपस्थित राहून उभयतांना शुभेच्छा दिल्या.

  यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, चंद्रशेखर दंडीमे, राजकुमार पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी पवार कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.

पवार-मोहिते परिवाराच्या साक्षगंध सोहळ्यास आ. रमेशआप्पा कराड यांची उपस्थिती
औसा विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आ अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परीक्षित आणि डॉक्टर उदयकुमार मोहिते पाटील यांची कन्या चैताली यांचा साक्षगंध सोहळा गुरुवारी दुपारी लातूर येथील थोरमोटे मंगल कार्यालयात संपन्न झाला. या सोहळ्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशअप्पा कराड आवर्जुन उपस्थित राहून भावी वधु वरांना शुभाआर्शिवाद दिले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, शिवाजीराव केंद्रे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, पत्रकार रामेश्वर बद्दर, भाजपाचे जिल्हा संयोजक तुकाराम गोरे, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे अध्यक्ष अनिल भिसे, राजकिरण साठे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अनेक जण होते यावेळी आ. कराड यांचे पवार आणि मोहिते परिवाराच्या वतीने आ अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]