Homeसामाजिकऔसा उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार - आ.पवार

औसा उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार – आ.पवार

औसा उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणारडीपीआर अंतिम टप्प्यात, नोटिफिकेशन व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात : आमदार अभिमन्यू पवार
औसा : औसा शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून, डीपीआर पूर्ण झाल्यानंतर नोटिफिकेशन आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर येत्या काही दिवसांतच औसा शहरातील उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.

औसा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये २ कोटी ५ लाख रुपयातून विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा शहरासाठी उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी उड्डाणपूल मंजूर होण्याच्या प्रक्रियेत असताना शहरातील काही नागरिकांनी उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा आदर करून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याची कार्यवाही केली होती. मात्र, त्यानंतर याच नागरिकांकडून पुन्हा उड्डाणपूल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून आपण पुन्हा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि उड्डाणपुलासाठी प्रयत्न सुरू केले.आता उड्डाणपूलाचे काम सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना पुन्हा त्याच लोकांकडून उपोषण करण्याची भाषा केली जात आहे. विकासकामांना विरोध करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आक्रमकपणे विरोध करण्याची गरज आहे, असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

औसा शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा असून, ‘आता कोणत्याही परिस्थितीत औसा शहरातील उड्डाणपूल होणारच,’ असा ठाम निर्धार आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात डीपीआर अंतिम टप्प्यात असून त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नोटिफिकेशन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.औसा शहरातील विविध विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणारऔसा शहरातील लिंगायत समाजाच्या मागणीचाही यावेळी आमदार पवार यांनी उल्लेख केला. औसा शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देऊन भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली होती. याबाबत आमदार पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली.ते म्हणाले की, प्रस्तावित उड्डाणपुलाची उंची, सर्व्हिस रोड आणि इतर तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला.

.तुळजापूर मोड येथे सहा कोटींचे जंक्शनऔसा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची घोषणा करताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, तुळजापूर मोड येथे नवीन जंक्शन उभारण्यात येणार असून त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या जंक्शनमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, शहराच्या विकासाला आणखी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सुभाष जाधव, मुक्तेश्वर वाघधरे, शेखर सोनवणे, भीमाशंकर राचट्टे ,अरविंद कुलकर्णी, किरण उटगे, संगमेश्वर ठेसे, सुनील मिटकरी, सुनील उटगे, ॲड. परीक्षित पवार,शिल्पा कुलकर्णी, बसवराज धाराशिवे, आकाश उटगे, अश्विनी स्वामी, माधवसिंग परिहार, व्यंकट मोरे, गंगाबाई कोदळीकर,शाम भोसले,सुधीर पोतदार, जयराज कसबे, परमेश्वर धुमाळ, रवी चिलमे, संदिपान शेळके, कल्पना डांगे, आक्रम पठाण, वसीम खोजण, मिनाज पटेल, मुजमील शेख, प्रियंका लद्दे, सुनीता सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments