26.2 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home कला *कर्तुत्ववान व्यक्तीचा पुरस्कार*

*कर्तुत्ववान व्यक्तीचा पुरस्कार*

0
411

साहित्य हे समाज जिवनाचा गढूळपणा कमी करते – डॉ नागोराव कुंभार

लातूर – ( प्रतिनिधी ) साहित्य हे समाज जिवनाचा गढूळपणा कमी करते असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार सरांनी साहित्य सारथी कला मंचच्या व्यासपीठावरुन केले, पुढे बोलताना सर म्हणाले साहित्य हे क्रांतीचे शस्त्र आहे आणि जेव्हा जेव्हा सत्येचा तोल जातो तेव्हा तेव्हा साहित्यिकच सांभाळतात.

साहित्य सारथी कला मंच आयोजित कार्यक्रमात सुरेश धोञे यांचे ‘मुक्या वेदना’ हे काव्यसंग्रह व ‘एका हाताचा योद्धा’ हे चरिञ तर दयानंद बनसोडे यांचे ‘प्रेमांकुर’ काव्यसंग्राहाचे प्रकाशन ,कवीता वाचन व कर्तृत्वान व्यक्तींच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत डॉ. नागोराव कुंभार , उद्घाटक डॉ.किरण वाघमारे , प्रमुख आकर्षण सिनेअभिनेते बालाजी सुळ तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्रटिकाकार भारत सातपुते, प्रहार शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, इतिहास संशोधक विवेक सौताडेकर, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते उमेश खोसे, प्रदेश सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा अँड. गणेश गोमचाळे, भाजपा नेते अमोल गिते, राष्ट्रीय काँग्रेस ओ.बी.सी.सेलचे लातूर शहराध्यक्ष जालिंदर बरडे, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी , सचिव दत्तात्रय जी परळकर हे मान्यवर उपस्थितीत होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आँड.हाशम पटेल होते. या प्रसंगी शादुल बौडीवाले यांना साहित्य सारथी कलारत्न पुरस्काराने,कु.मयुरी जगदाळे यांना विद्यारत्न,ह.भ.प.शिवराज महाराज (कारभारी)यांना समाजरत्न,वैभव साळुंके यांना साहित्यरत्न,ओमकार मसकल्ले यांना कृषीरत्न,रेखाताई गणापुरे यांना निसर्गमिञ,मंगलबाई मटवाड आणि भारतबाई विठ्ठलराव कल्याणे यांना आदर्श माता, डाँ.बालाजी सावंत यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.


या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य सारथी कला मंचचे गंगाधर डिगोळे, प्रेमकवी सुरेश धोत्रे, विवेकानंद बनसोडे, आकाश बावगे, आशाताई शिंदे, शिवशंकर बलुले,विष्णुदास आमदापुरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रेमकवी सुरेश धोत्रे, सुत्रसंचलन गणेश परळे यांनी केले तर आभार गंगाधर डिगोळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]