28.6 C
Pune
Thursday, May 14, 2026
Home ठळक बातम्या घाणीचे साम्राज्य

घाणीचे साम्राज्य

0
378

*माकणी थोर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य*

निलंगा,-(प्रशांत साळुंके)- महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील माकणी थोर येथील जाज्वल्य हनुमान देवस्थान परिसरात नालीचे व पावसाचे पाणी साचल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येवढे होत असताना सुद्धा ग्रामपंचायत व देवस्थान कमिटी कुठलाही ठोस निर्णय न घेता मूग गिळून गप्प बसून एकमेकाला बोट दाखवत आहेत.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की तीर्थक्षेत्राचा ब , दर्जा प्राप्त असल्यामुळे सहा वर्षापूर्वी माकणी देवस्थानच्या विविध विकास कामासाठी दोन कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला होता .त्यापैकी सुमारे ६० ते ६५ लक्ष निधी मंदिर कमिटीने परिसरातील रस्ते व नाली बांधकाम करण्यासाठी खर्च केला. व त्याचे काम ही मनमानी करत तत्कालीन पंचायतच्या परस्पर केले. कुठल्याही पाण्याचा प्रवाह योग्य दिशेनं काढून देणे अपेक्षित असताना गावातील काही आडमुठ्या लोकांमुळे व काहींच्या खोट्या राजकीय द्वेशापोटी पाण्याचा प्रवाह बदलून विरुद्ध दिशेनं नाली बांधकाम करण्यात आले. परिणामी पाणी सरळ न जाता पाणी अडखळून नालीत साचून राहत आहे.

याबाबत ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत देवस्थान समिती यांच्याकडे लेखी नोटीस ही देण्यात आली आहे. खर तर प्रत्येक गावात राजकारण असते परंतु धार्मिक ठिकाणी राजकारण करणे किती योग्य आहे? अन् गावात कितीही संस्था असल्या तरी त्या संस्थेवर लक्ष ठेवणे हे ग्रामपंचायतची नैतिक जबाबदारी असताना नोटीस पाठवून पंचायतने हात झटकने हे कितपत योग्य ? कुठलेही अतिक्रमण असो अथवा गावच्या विकासासाठी निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार ग्रामपंचायतीचा असताना देवस्थान समिती यांच्याकडे बोट करून आणखीन किती दिवस लोटायचे? सध्या सर्वत्र डेंग्यू सारख्या महाभयंकर आजाराचा सर्वत्र विळखा असून यावावर नियत्रंण आण्यासाठी सरकार दरबारी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु संपूर्ण पंचक्रोशीत नावाजलेल्या माकणी थोर मंदिर परिसरातील घाणीचे साम्राज्य गेल्या अनेक दिवसांपासून हटत नसल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]