Homeउद्योग*क्रेडाईच्या राज्य सहसचिवपदी डाॅ.धर्मवीर भारती यांची निवड*

*क्रेडाईच्या राज्य सहसचिवपदी डाॅ.धर्मवीर भारती यांची निवड*

लातूर-(प्रतिनिधी)-बांधकाम क्षेञात देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी ,तसेच ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी संघटना म्हणून क्रेडाई गेली अनेक वर्षांपासून देशपातळीवर काम करत आहे.या संघटनेच्या राज्य सहसचिवपदी लातूर येथील डाॅ.धर्मवीर भारती यांची बिनविरोध निवड झाली आहे.


क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे.ही डाॅ. धर्मवीर भारती हे या अगोदर लातूर क्रेडाईचे अध्यक्ष राहिले आहेत.तसेच त्यांनी क्रेडाईच्या विविध राज्य कमिटीवर काम केलेले आहे.
बांधकाम क्षेञातील डाॅक्टरेट पदवीही त्यांनी संपादन केलेली आहे.लातूर शहरातील सर्वात मोठा नाविन्यपूर्ण गृहप्रकल्प ते साकारत आहेत.


बांधकाम क्षेञ व क्रेडाई संघटनेसाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्यांना राज्य सहसचिव हे महत्त्वाचे पद देण्यात आले आहे.तसेच लातूर क्रेडाईच्या इतिहासात राज्य पदाधिकारी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments