30.2 C
Pune
Monday, June 22, 2026
Home ठळक बातम्या *ग्राहक संरक्षण सेल; शहर जिल्हाध्यक्षपदी संजय निलेगांवकर*

*ग्राहक संरक्षण सेल; शहर जिल्हाध्यक्षपदी संजय निलेगांवकर*

0
551

लातूर/प्रतिनिधी:काँग्रेस पक्षाच्या ग्राहक संरक्षण सेल लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी संजय निलेगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून संजय निलेगांवकर हे काँग्रेसमध्ये सक्रिय असून ब्लॉक अध्यक्षपदी यशस्वीरित्या कार्यरत आहेत.प्रदेश काँग्रेसने आता त्यांना पक्षाच्या ग्राहक संरक्षण सेलच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.महाराष्ट्र ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुख नितीन पाटील यांचीही नियुक्तीपत्र देताना उपस्थिती होती.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख,आ.धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिकपणे काम करत राहू,अशी प्रतिक्रिया संजय निलेगांवकर यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]