महाराष्ट्र दहावी बोर्ड निकाल 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या सात विद्यार्थ्यांना 500 पैकी 500 गुण
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात फिजिक्सवालाच्या PW Udaan 2026 (Class 10th) Maharashtra Batch मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत फिजिक्सवालाच्या सात विद्यार्थ्यांनी 500 पैकी 500 गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.
500 पैकी 500 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अर्पिता दत्ता वाडकर (लातूर), ओमकार कल्याण राठोड (लातूर), मृण्मयी संतोष वाईकर (छत्रपती संभाजीनगर), रुद्र अभय उत्पात (पुणे), शिवम दत्तात्रय चाटे (लातूर), स्नेहा चक्रधर करभारी (लातूर) आणि सूरज अंकुश बाडे (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

याशिवाय, 25 हून अधिक विद्यार्थ्यांनी 99 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवले, तर 55 हून अधिक विद्यार्थ्यांनी 98 टक्के व त्यापेक्षा अधिक, 98 हून अधिक विद्यार्थ्यांनी 97 टक्के व त्यापेक्षा अधिक, 156 हून अधिक विद्यार्थ्यांनी 96 टक्के व त्यापेक्षा अधिक, तसेच 254 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तब्बल 936 हून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या निकालात 27 विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले, तर 9 विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात पूर्ण गुण मिळवले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना फिजिक्सवालाचे संस्थापक व शिक्षक अलख पांडेय म्हणाले, “महाराष्ट्र बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. फिजिक्सवालामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुलभ शिक्षण उपलब्ध करून देण्यावर आमचा भर कायम राहील.”
फिजिक्सवाला महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस, प्रॅक्टिस मॉड्यूल्स, डाऊट सॉल्व्हिंग सपोर्ट आणि बोर्ड परीक्षेसाठी अभ्यासक्रमाधारित मार्गदर्शनाच्या माध्यमातून सातत्याने मदत करत आहे.




