*मुंबई 20 नोव्हेंबर, 2026: उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बाबुराव बनसोडे यांना साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, शासनाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना जनकल्याणासाठी दिलेले योगदान तसेच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण माने यांच्या माध्यमातून सन २००० पासून सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार संजय बनसोडे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना प्रमुख मान्यवर म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये शासकीय सेवेसाठी ‘सेवा रत्न पुरस्कार’ महेंद्र कल्याणकर (IAS), विनिता देव सिंघल (IAS), अशोक काकडे (IAS), सुरज मांढरे (IAS), सुहास दिवसे (IAS), अजित कुमार (IAS) आणि स्वाती म्हसे पाटील (IAS) यांना प्रदान करण्यात आला आहे.
‘रणझुंजार पुरस्कार’ विजय सिंह (IPS) आणि बजरंग बनसोडे (DCP) यांना देण्यात आला आहे. अभिनय आणि चित्रपट क्षेत्रातील अनुपम खेर, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, अशोक सराफ, सयाजी शिंदे, भाऊ कदम, साई ताम्हणकर, मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर, कविता लाड, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक कलाकारांचा पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे.आमदार संजय बनसोडे यांना मिळणारा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याची आणि जनसेवेच्या योगदानाची दखल घेणारा सन्मान आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार असल्याने उदगीरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या पुरस्काराची विशेष चर्चा होत आहे.उदगीरच्या लोकप्रतिनिधीचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या मंचावर होणारा हा गौरव निश्चितच उदगीरकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे

.000 00



