Homeसांस्कृतिक*पं. रघुनंदन पणशीकर यांची गायन मैफल*

*पं. रघुनंदन पणशीकर यांची गायन मैफल*


-(लातूर)- गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे पट्टशिष्य व जयपुर घराण्याचे प्रख्यात गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन, अभंगवाणी, नाट्यसंगीत अनुभवण्याची संधी लातुर येथील गंजगोलाई मधील जगदंबा महोत्सवात आज सायंकाळी 9:30 वाजता संगीत रसिकांना मिळणार
आहे.

पणशीकर यांनी सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवल्लभ संगीत समारोह यासह दुबई, अमेरिका येथे गायन सादर करुन जगभरातील संगीत रसिकांची दाद मिळवली आहे. जय जगदंबा नवरात्र मंडळ, गोलाई, लातुर यांच्या तर्फे ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. त्यांना तबल्यावर युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक श्री. अविनाश पाटील , पखावज वर आसाराम साबळे, हार्मोनियम वर ओंकार पाठक हे साथ संगत करतील.तरी या संगीत मैफिलीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा महोत्सवातील संयोजन समितीच्या वतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments