Homeराजकीयबिनबुडा आरोप ; आमदार अभिमन्यू पवार यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

बिनबुडा आरोप ; आमदार अभिमन्यू पवार यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून अभिमन्यू पवार आक्रमक, आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा…..

औसा (प्रतिनिधी ) :- मागील काही दिवसांपासून एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून माझ्यावर काही राजकीय मंडळींकडून बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारे विनाकारण बदनामी करणाऱ्यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला.

औसा येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार बोलत होते. यावेळी त्यांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून होत असलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी विद्यार्थी आंदोलन करत असताना आपण त्यांच्या न्याय हक्कासाठी उभे राहिलो होतो. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या काळातील एखादा फोटो दाखवून आपला पेपरफुटी प्रकरणाशी संबंध असल्याचे चित्र निर्माण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.माझे लाखो विद्यार्थ्यांसोबत फोटो आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीशी आपला संबंध आहे, असा अर्थ होत नाही, असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससी पेपरफुटीचा प्रकार नंदुरबार येथे घडला असून, ज्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली किंवा ज्यांना अटक करण्यात आली, त्याबाबत न बोलता केवळ फोटोच्या आधारे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीला विनाकारण बदनाम करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. अशा प्रकारे उठसूट आरोप करणाऱ्या मंडळींविरोधात आपण स्वतः कायदेशीर तक्रार केली असून, बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

डॉ. शेख यांचे आभार

दरम्यान, आपल्यावर आरोप होत असताना मतदारसंघातील जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मित्रपक्षातील आणि इतर नागरिकांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल आमदार पवार यांनी आभार मानले. सोशल मीडिया, वैयक्तिक फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे औसा प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार पवार यांच्यावरील आरोप खोडून काढत त्यांच्या विकासकामांची माहिती जनतेसमोर मांडली. या पाठिंब्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी डॉ. अफसर शेख यांचे विशेष आभार मानले.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि त्यावरून सुरू असलेले राजकीय आरोप यामुळे या विषयाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोप आणि प्रत्यारोपांपेक्षा संबंधित प्रकरणातील अधिकृत चौकशी, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यावरच वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून होत असलेल्या आरोपांवर आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments