Homeराजकीयमाजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

*माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*

*माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम*

उदगीर 🙁 माध्यम वृत्तसेवा )- माजी मंत्री तथा उदगीर-जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहरासह मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला.

काल कार्यकर्ते व पदाधिका-यांनी शालेय साहित्य भेट देवुन सत्कार केला.वाढदिवस कृती समीतीच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, रुग्णांना फळे व औषधांचे वाटप, दर्गा येथे चादर चढविणे, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, वृक्षारोपण, अन्नदान तसेच गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा गौरव केला. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघाच्या विकासाला गती मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले.या प्रसंगी अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विविध सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजहिताची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.दिवसभर शहर व ग्रामीण भागात शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी केक कापण्याऐवजी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वाढदिवस साजरा केला. त्यामुळे हा वाढदिवस केवळ उत्सव न ठरता समाजसेवेचा संदेश देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी उपसभापती रामराव बिरादार, जि. प. चे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, नगरसेवक सचिन हुडे, उपनगराध्यक्षा सौ. शितल शिंदे, जि.प. सदस्य दिलीप मटके, डॉ. दीपक सोमवंशी, उषा कांबळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानिमियाँ, ता.कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, गटनेते तथा नगरसेवक अनिल मुदाळे, उपसभापती बापूसाहेब भोसले, प्रा. शाम डावळे, नगरसेवक अनिरुद्ध गुरुडे, बांधकाम सभापती राजकुमार भालेराव, स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, नगरसेवक इम्रान सय्यद, नगरसेवक शिवकुमार कांबळे, इमरोज हाश्मी, नगरसेविका वर्षा कांबळे, नरसिंग शिंदे, फैजुखाँ पठाण, सर्जेराव भांगे, प्रकाश बिरादार, प्रकाश राठोड, अमोल अनकल्ले, धनराज नादरगे, संग्राम हासुळे पाटील, चंदन पाटील नागरगोजे, संगम टाले, अर्जुन आगलावे, सत्यवान दळवे पाटील, चंद्रशेखर पाटील, पाशा शेख, आदीसह सह ग्रामीण भागातील सरपंच व चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments