Homeराष्ट्रीय*दिनेश गिल्डा यांची भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड*

*दिनेश गिल्डा यांची भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड*


लातूर ः मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांची भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष बाबुलाल गुप्ता यांनी एका पत्रकान्वये त्यांची कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड घोषीत केली आहे. या निवड समितीवर महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. त्यातील मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. गेल्या दहा वर्षापासून मराठवाडा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापार्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविण्याचे काम सातत्याने ते करत असतात. त्यांच्या कार्याची दखल म्हणून भारतीय उद्योग व्यापार मंडळाने त्यांची हि निवड केली आहे.
भारतीय उद्योग व्यापार मंडळ हे केंद्रीय संघटन आहे. देशभरातील व्यापार्‍यांच्या प्रश्‍नावर तसेच केंद्र शासनासोबत विचार-विनीमय करण्याचे काम करत असते. यानिमित्ताने व्यापारी महासंघाला हा बहुमान प्राप्त झाला आहे. या निवडीबद्दल लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख, व्यापारी धिरज तिवारी, अ‍ॅड.संतोष गिल्डा, नागेश बावगे, वसंत गुंड, निजाम शेख, बसवराज वळसंगे, मनोहर कोरे, अजय राजपुत, राजाभाऊ गर्जे आदि व्यापार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments