30.2 C
Pune
Wednesday, May 13, 2026
Home महाराष्ट्र राज्यपालांची भेट

राज्यपालांची भेट

0
234

डॉ. विठ्ठलराव जाधव यांची राज्यपालांशी भेट
————————
सामाजिक व युवकांच्या प्रश्नाविषयी केली चर्चा
मुरूम, ता. उमरगा, ता. १९ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीदुत परिवारच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन रविवारी (ता.१५) रोजी राजभवन येथे भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्याविषयी सखोल चर्चा झाली. राज्यपालांनी शिष्टमंडाळातील प्रत्येक सदस्यांना वैयक्तिक चर्चा करून सामाजिक कार्याविषयी माहिती घेतली. शांतीदुत परिवारच्या वतीने महाराष्ट्र राज्यासह देश-विदेशातील अनेक ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या रक्तदान, वृक्षारोपण, गरजुंना मदत, युवक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन आदी उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक केले. यावेळी राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव व शांतीदुत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बडवे इंजिनिअरींग प्रा. लि.चे संचालिका तथा शांतीदुत परिवारच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रीया बडवे यांची महिला उद्योजक विकास परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने व त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल राज्यपालांनी सत्कार केला. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. तृशाली जाधव यांनी अॅक्युमन या नविन शिक्षणपध्दतीविषयी राज्यपालांना शैक्षणिक संच भेट देऊन चर्चा केली. यावेळी मायक्रोकॉमचे संचालक तथा शांतीदुत युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला यांनी राज्यपालांना ‘ विठ्ठल झालाशी कळस ‘ हा ग्रंथ भेट दिला.

डॉ. जाधव यांनी कारागृहातील कैद्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. डॉ. जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या सध्या सर्वत्र करत असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]