Homeशैक्षणिक*विज्ञान प्रसारक डॉ अजय महाजन यांचा नागपूर येथे सन्मान*

*विज्ञान प्रसारक डॉ अजय महाजन यांचा नागपूर येथे सन्मान*

नागपूर ; ( प्रतिनिधी) –

असोसिएशन ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन (ए आर टी बी एस ई), नागपूर या संस्थेद्वारे दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करीत असते. यावर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे २५ वे वर्ष असल्यामुळे त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशभरातील विज्ञान प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक विज्ञान प्रसारकांचा सन्मान नागपूर येथे आयोजित केला होता. यामध्ये लातूर विज्ञान केंद्राचे सचिव डॉ अजय महाजन यांना त्यांनी मागील २० वर्षात लातूर विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केलेल्या विज्ञानाच्या क्षेत्रातील समाजाभिमुख, नाविन्यपूर्ण आणि वैज्ञानिक दृष्टी निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सन्मानित करण्यात आले.

विज्ञान प्रसार, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली येथील संचालक डॉ नकुल पाराशर आणि एस ओ ए विद्यापीठ, भुवनेश्वर चे प्र-कुलगुरू डॉ अमित बॅनर्जी यांच्या हस्ते डॉ अजय महाजन यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुरेश अग्रवाल, ए आर टी बी एस ई चे सचिव आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याचे संयोजक, रघु ठाकूर, अध्यक्ष, डॉ राजाराम शुक्ला, कार्यकारी अध्यक्ष व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments