21.2 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeसामाजिक*सौ.जयनंदा नागनाथ गीते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*

*सौ.जयनंदा नागनाथ गीते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*


लातूर(प्रतिनिधी): लातूर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नागनाथ गीते यांच्या पत्नी सौ.जयनंदा नागनाथ गीते यांचा वाढदिवस श्री गुरु गणेश जीवनराज जैन गोरक्षण गोशाळा लातूर येथील 300 गाईंना चारा व आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात करण्यात आले. त्यासोबतच मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मदत म्हणून तेथील सर्व वृद्धासाठी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. इतकेच नाही तर शासकीय रुग्णालय लातूर येथे 200 लोकांना जेवणाचे वाटप करण्यात आले. अशा विविध उपक्रमांनी सौ.जयनंदा गीते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

हा वाढदिवस साजरा करतांना आपणही समाजाचे काहीतरी देणे आहोत व आपल्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांना किंवा गरजूंना काहीतरी मदत करण्याची तळमळ व चांगली भावना मनी बाळगून सौ.जयनंदा गीते यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. गौशाळेमध्ये चारा व साहित्यांचे वाटप यावेळी केले. सौ.जयनंदा गीते यांच्या हस्ते गौशाळेमधील गायींचे पूजन व आरती करून  कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थितीत राहून सौ.जयनंदा नागनाथ गीते यांना शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी लातूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक धर्मवीर भारती, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनिलजी पुरी, तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुजी शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, विधी सल्लागार जितेंद्र पाटील, यांच्यासह समृद्ध व्यापार वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय परळकर, आदित्य एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोळे, धैर्य कन्सल्टंटचे संभाजी तांदळे, हरिराम उकरले, नरसिंह वेदपाठक, प्राचार्य महादेव मद्दे, शिवकुमार गिरी, माधव तरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कालपरिवर्तन वृत्तपत्राचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नागनाथ गीते व त्यांच्या परिवारांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

या वाढदिवसाच्या माध्यमातून सौ.जयनंदा नागनाथ गीते परिवारांनी जो संदेश दिला आहे तो म्हणजे आज आपण जे पाहतो की वाढदिवस म्हटला की हजारो रूपयांचा विनाकारण खर्च करतात पण असे न करता गीते परिवारांनी आपला वाढदिवस गोरगरीब जनतेतून जावून साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासून ज्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला आहे तो खरोखरच चांगला उपक्रम आहे. या त्यांच्या कार्याचे समाजातील सर्वक्षेत्रातून कौतुक होत आहे व सौ.जयनंदा नागनाथ गीते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]