मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषद शाळेला दिली अचानकपणे भेट.
ऊसतोड करणार्याच्या पाल्याशी केला संवाद.
औसा प्रतिनिधी
आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषद बेलकुंड शाळेला अचानकपणे भेट दिली. गाडीतून उतरल्या उतरल्या दहावी वर्गावर जाऊन विद्यार्थ्याला फळ्यावर गणित देऊन सोडवून घेतले. सातवी वर्गात जाऊन लसावी मसावी गणित सोडवून घेतले. सर्व विद्यार्थ्यानी गणित सोडविल्या बद्दल समाधान व्यक्त केले व बक्षीस म्हणून विद्यार्थ्याला चॉकलेट वाटप केले. इयत्ता सातवी वर्गातील ऊसतोड करणार्या पालकाच्या मुलीने प्रवेश घेतला होता तिने गणित सोडविल्या बद्दल तिचे अभिनंदन करून शिक्षणाविषयी माहिती घेतली. ऊसतोड करणार्या मुलामुलीं साठी शाळेत ज्यादा तासिका घेऊन विद्यार्थ्याला शिकवावे असे शिक्षकाला आदेश दिले. व शाळेमधे पालक मेळावा घेऊन विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासावी असा आदेश शिक्षकाला दिला.

त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तपासे यांनी जिल्हा परिषद कडून शाळांसाठी चार वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. आणि पाच लाखाची दुरुस्ती आली आहे. शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक चे काम व चार वर्ग खोल्याचे लवकरात लवकर काम चालू करावे अशी मागणी केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले. यावेळी वर्ग शिक्षक मधुकर गोरे, शेख सर, प्रभारी मुख्याध्यापक गणेश दीक्षित उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी अचानकपणे बोरफळ, शिंदाळा, सोन चिंचोली, बेलकुंड, माळकोंडजी येथील शाळांना अचानकपणे भेट दिली. त्याचबरोबर बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ही भेट दिली. बेलकुंड येथील सरपंच विष्णु कोळी यांनी बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला संरक्षण भिंत आणि जिल्हा परिषद शाळेतील चार नवीन वर्ग खोल्या व पाच लाखाच्या दुरुस्तीची मागणी केली.