29.7 C
Pune
Wednesday, May 27, 2026
Home उद्योग विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदिपन

विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदिपन

0
196

विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न;८ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

लातूर प्रतिनिधी : शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५: या वर्षी कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता मोठया प्रमाणात आहे. या अनुषंघाने गळीत हंगामात उच्चांकी ऊसाचे गाळप आणि ऊच्चांकी साखर ऊतारा मिळवण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाने सज्ज रहावे, असे आवाहन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी केले.विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२५-२६ चे बॉयलर अग्निप्रदिपन शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

यावर्षी मृगासह परतीचा पाऊस चांगला झाला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्हयात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाचे क्षेत्र पाहता कारखाना हंगाम यशस्वीपणे पार पडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरु होत असलेल्या गळीत हंगामातील ८ लाख मे. टन ऊसाचे गाळप उदिष्टय साध्य करण्यासाठी कारखाना सज्ज केला असून गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा, हंगाम सुरु असतांना तांत्रीक कारणाने कारखाना बंद राहणार नाही यासाठी हंगाम बंद काळातील कामे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहेत.

कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम प्रसंगी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. तसेच नवीन हार्वेस्टरचे पूजनही यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विलास कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, ट्रवेन्टीवन शुगर्सचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, सतिश शिंदे (पाटील), अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, रंजीत पाटील, रसुल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दिपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने व रमेश देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख पूढे बोलतांना म्हणाल्या, विलास कारखानाची वाटचाल पाहून आदरणीय साहेबांच्या धोरणा प्रमाणे त्यांचे कार्य पूढे जात आहे हे पाहून आनंद होत आहे. आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात आपली कोणतीही अडचण असल्यास तुम्ही हाक मारा, आम्ही आपल्या मदतीला धावून येऊ असे सांगीतले. यावेळी व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे यांनी गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्हयामध्ये सहकार आणि साखर उदयोग आपल्या नेतृत्वाने उभा केला या माध्यमातून आपला सर्वांचा विकास झाला आहे. यामध्ये साखर कारखान्याचे योगदान मोलाचे आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात चांगले गाळप होण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले, यावेळी बोलतांना ते म्हणाले, गळीत हंगामाची जय्यत तयारी झाली आहे. कारखाना तांत्रीकदृष्टीने बंद राहणार नाही यांची काळजी घेऊन गाळप उदीष्टय पूर्ण केले जाईल. तसेच या वर्षीच्या हंगामात विक्रमी गाळपाचे आणि साखर उताराचे उदीष्टय साध्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रारंभी विलास साखर गणेशोत्सव मंडळाकडून कर्मचाऱ्यासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धांतील विजेत्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते पारीतोषिक देण्यात आले. तसेच बॉयलर अग्नी प्रदिपन प्रसंगी बॉयलर अटेडंन्ट पद्माकर चौगुले, हनमंत शेडगे, सुर्यकांत माळी, जानुमियॉ शेख, दत्ता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगीची महापूजा संचालक हणमंत पवार आणि सौ. व्दारका पवार यांच्य हस्ते करण्यात आली. सुत्रसंचालन राहूल इंगळे यांनी केले तर आभार संचालक शाम बरुरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व सभासद, ऊसउत्पादक, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]