Homeशैक्षणिकदिशा प्रतिष्ठानचा दिशादर्शक उपक्रम

दिशा प्रतिष्ठानचा दिशादर्शक उपक्रम

दिशा प्रतिष्ठानतर्फे १२ विद्यार्थ्यांना ₹१,६१,४२० चे शैक्षणिक सहकार्य

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे खंडित होऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून दिशा प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने १२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश शुल्कासाठी एकूण ₹१,६१,४२० रुपयांचे आर्थिक सहकार्य धनादेशाद्वारे करण्यात आले.

या उपक्रमाचा लाभ अभिजित नवनाथ गोरे, स्वप्नील प्रशांत निंबुरगे, श्रीनिवास विश्वास देशपांडे, प्रणव ज्ञानेश्वर वरेकर, हुनेनफरयाल वसीम पठाण, स्नेहा प्रकाश बंग, अनम समद शेख, श्रद्धा संतोष नंदगैळे, अंकिता अशोक सौदागर, संध्याराणी संजय सोमवंशी, पूजा विभीषण सोमवंशी आणि वैष्णवी संतोष बावगे या १२ विद्यार्थ्यांना झाला.“एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या ध्येयाने दिशा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. हनुमंत किनीकर हे होते. मा. अविनाश कामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. सचिन बंडापल्ले, मा. मल्लिकार्जुन माकणे, मा. प्राचार्य निलेश राजेमाने, मा. शिवाजी देशमुख, मा. हंसराज जाधव, मा. दत्ता पाटील कामखेडकर, मा. सुनील कांबळे, मा. अवेज काझी, मा. गणेश बेळंबे, मा. मुबिन शेख आणि मा. सचिन झेटे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केले. त्यानंतर दत्ता पाटील कामखेडकर, प्राचार्य निलेश राजेमाने, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले तसेच महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते डॉ. गणेश बेळंबे यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. हनुमंत किनीकर यांनी दिशा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे सहकार्य ही समाजाप्रती मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, फिरता दवाखाना प्रमुख इसरार सगरे, प्रकल्प समन्वयक वैशाली यादव आणि कोषाध्यक्ष अजय शहा यांच्या हस्ते मान्यवरांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच दिशा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.“एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या उद्देशाने दिशा प्रतिष्ठान भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments