25.6 C
Pune
Thursday, March 19, 2026
Homeराजकीयभाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन

भाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन

संसदेचा अवमान केल्याचा आरोप; राहुल गांधी व काँग्रेसविरोधात भाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन

लातूर (प्रतिनिधी)देशाच्या संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत राहुल गांधी व इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिनांक १२ मार्च २०२६ रोजी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चहापार्टी आयोजित केली. या कृतीमुळे देशाच्या संसदेसह संपूर्ण जनतेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत भाजपच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संसदेला पिकनिक स्पॉट बनवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असून तो देशाच्या लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनावेळी मनपा गटनेते दिपक मठपती, जिल्हा सरचिटणीस संजय गीर, रागिणीताई यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, स्वातीताई घोरपडे, करुणा शिंदे, अनंत गायकवाड, उद्धव तेलंगे, ऋषिकेश राजे, विनय जाकते, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, एससी मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, महिला मोर्चा अध्यक्षा शितल मालू, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाश्मी, मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सुरेश जाधव, निर्मलाताई कांबळे तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी धनंजय हाके, सुरेश राठोड, देवा गडदे, महादेव कानगुले, बाबा गायकवाड, विजय अवचारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गजानन गंभीरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]