श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम
आज नववर्षाचे स्वागत भव्य शोभायात्रा
लातूर : राम गल्ली येथील श्रीराम मंदिर संस्थान यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा निमित्ताने तसेच श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी १९ मार्च २०२६ दुपारी ४.०० वाजता हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २० ते २५ मार्च दरम्यान दररोज सकाळी ८.०० वाजता अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.

याचबरोबर दररोज दुपारी ३.०० वाजता विविध भजनी मंडळांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सांयकाळी ७ वाजता मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे . २० मार्चला तुकाराम महाराज चिंचणीकर यांचे भवितव्य हिंदूचे , २१ मार्चला गौरवशास्त्री देशपांडे यांचे पंचांगातील विज्ञान, २२ मार्चला अक्षय व्हावले यांचा भावगीते श्रीरामाचे गायनाचा कार्यक्रम, २३ मार्चला राजेशजी संन्यासी यांचे कुटुंब प्रबोधन या विषयावर , २४ मार्चला योगेश महाराज सालेगावकर व रेणुका मिसळ यांचे शिवचरित्र व रामायणातील विषयांवर प्रवचन होणार आहे . २५ मार्चला डॉ विवेक सौताडेकर यांचे रत्नापूर ते लातूर या विषयावर व्याख्यान होणार आहे, दि. २६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी १० ते १२ यावेळेत अप्पाराव कुलकर्णी यांचे प्रवर्चन होणार आहे . दररोज सायंकाळी ५.३० वाजता रामरक्षा व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.




