Homeआरोग्य वार्तामुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबीर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबीर

*मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग शिबिरास प्रतिसाद*

*लातूर, दि.२३( माध्यम वृत्तसेवा):- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि पोद्दार हॉस्पिटल एक्सीडेंट अँड ड्रामा केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.*

या शिबिरामध्ये ५८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले आणि त्यांना योग्यतो सल्लाही देण्यात आला. यामध्ये २५ रुग्णांची रक्त तपासणी, 23 रुग्णांचा एक्स-रे ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये काढून देण्यात आला. एम आर आय सिटीस्कॅन हायटेक इन्स्टिट्यूट आणि रक्त तपासणी ओम साई पॅथॉलॉजी लॅब यांच्या सहकार्याने करण्यात आली.

सिग्नल कॅम्प भागातील पोद्दार हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत अस्थिरोग तपासणी ,फिजिओथेरपी, मशीनद्वारे हाडाचा ठिसूळपणा तपासणी, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया व सांधेरोपण शस्त्रक्रिया आदी मोफत तपासण्या करण्यात येऊन मोफत औषधीचे वाटपही करण्यात आले . यावेळी रुग्णांनी मोठी गर्दी केली होती.

सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इमरान कुरेशी ,डॉ. सिद्राम भोसगे, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. फिरदोस इनामदार , डॉ कपिल घुमरू आदींनी रुग्णांची तपासणी केली.डॉ. अशोक पोद्दार आणि आरोग्य शिबीर हे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी एक अतूट नाते बनल्याचे मत यावेळी अनेकानी आपल्या भाषणात व्यक्त केले. दिवंगत लोकनेत्याच्या पुण्यतिथी – जयंतीदिनी ते नियमित अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करतात. रुग्णसेवेस प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील , तळागाळातील रुग्णांनाही अशा शिबिरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

प्रारंभी नगरसेविका प्रेरणा होनराव यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून या मोफत शिबिराची सुरुवात करण्यात आली .यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे लातूर कक्ष अधिकारी डॉ ऋषिकेश खरोळकर, नगरसेवक देविदास काळे, अँड .दीपक मठपती, प्रवीण कस्तुरे, अँड .प्रदीप मोरे, शिरीष कुलकर्णी,आदींची प्रमुख उपस्थिती होती.शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह सर्व स्टाफने परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments