जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून चाकुरचे
नगराध्यक्ष कपिल माकणे आणि उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार यांचे अभिनंदन
लातूर दि. ११ चाकूर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी कपिल माकणे आणि उपनगराध्यक्ष भाजपाचे अरविंद बिराजदार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, भाजपा बुद्धिजीवी सेलचे जिल्हा संयोजक विजय शिरसागर, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील, चाकुर तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे, सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी, प्रशांत बिबराळे, रुपेश कोरमुळे, चाकुरचे भाजपा प्रभारी शंकर रोडगे यांच्यासह अनेक जण होते.





