मोलमजुरी करत पती-पत्नीने बांधले मंदिर तर गावकऱ्यांनी चढविला कळस…
तीन जिल्ह्यत पहीली एक मुखी दत्त मूर्ती मसलग्यात..
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
तालुक्यातील मसलगा येथील एका पती-पत्नीने मोलमजुरी करून जमविलेल्या पैशातून एक दत्त मंदिर उभा केले
मोठ्या कष्टातून उभारलेल्या मंदिरास गावकऱ्यांनीही मोलाची साथ देत दत्त मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे
मसलगा येथे दत्तभक्त मुक्ताबाई शिंदे व ज्ञानोबा शिंदे या पती पत्नी ने स्वकष्टातुन दत्तमंदिराची उभारणी केली असून या त्यांच्या प्रयत्नाला ग्रामस्थांनी साथ देत दि. 7 ते 13 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा व तसेच दत्त शिखर माहुर गडाचे पुजारी वासुदेवानंद भारती व गुरू बळीराम भारती यांच्या हस्ते दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि. 13 फेब्रुवारी रोजी दत्तभक्ताच्या उपस्थित संपन्न झाला.
माळरानावर फुलवले नंदनवन…

येथील माळरानावर आंबा चिकू पेरू रामफळ शिताफळ आदि झाडांची लागवड करत आदी फळांची झाडे बहरात आहेत फळांचे व फुलांचे झाडे चांगलेच बहरात आल्याने येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत व येथील
सोलापूर लातूर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात प्रथमच एकमुखी दत्त मंदिराची उभारणी केली आहे यामुळे याला विशेष असे लातूर जिल्ह्यामध्ये महत्व प्राप्त झाले आहे
या सोहळ्यात द.भ.प. मारोती महाराज शंभरगावकर, द.भ.प.शिवाजी महाराज टाकळीकर, द.भ.प. प्रताप महाराज पिंपलकोठेकर, द.भ.प. शेषेराव महाराज उमाटवाडीकर, द.भ.प.गोविंद महाराज आळेगावकर, द.भ.प. देविदास महाराज लाठीकर, यांची कीर्तने झाली. व ग्रथवाचन देवीदास महाराज लाठीकर व लक्ष्मण इंगोले, नागोराव आलेगावकर यांनी केले तर दिगंबर जिरमिरे, समाधान जिरमिरे व भजनी मंडळ कन्हेरी, भजनी मंडळ लाठी व भजनी मंडळ मसलगा यांनी भजन सेवा केली.
या सोहळ्यासाठी बालाजी पिंड, मोहनराव पिंड, दिलीप जाधव, बापुराव जाधव, साहेबराव मोहिते, सतीष जाधव, विलास पाटील, प्रकाश देशमुख, दिगंबर पवार, संजय नरहारे, तुळशीदास साळुंके, संतोष तोरखडे, हारीदास साळुंके, शिवाजी तोरखडे, धोंडीराम पिंड, व्यंकटराव जाधव, ज्ञानेश्वर पिंड, प्रदिप पिंड, गुरूनाथ जाधव, बाबुराव शेळके, शिवाजी जाधव, शिवाजी लव्हरे, रघुनाथ तोरखडे, कृष्णा जाधव, दत्तात्रय जाधव, गणी शेख, रमेश पाटील, दिनकर बनसोडे, पांडुरंग जगताप, विठ्ठल शिंदे, प्रशांत लव्हरे, महेश मोहिते, आशीष पाटील, तन्मय कुलकर्णी, राहुल गिरी, मंथन धुमाळ, संभाजी राजे, विजय सलघंटे, ज्ञानेश्वर तेलंगे, बालाजी शिंदे, अंगद हलसे, सचिन शिंदे, अनंत हजारे, धनाजी शिंदे, अरविंद बनसोडे, शिवा कांबळे, चंद्रकांत कांबळे, पत्रकार माधव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी आदीसह गावातील युवकांनी योगदान दिले आहे
या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची उपस्थिती होती