आमदार धिरज देशमुख यांचे आवाहन; सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख चषक २०२२ स्पर्धेस सुरवात––
रेणापूर :
मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते. शिवाय, व्यक्तिमत्व विकासही होतो. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी क्रिकेट, कबड्डी यासारख्या मैदानी खेळाकडे वळावे, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी येथे केले.
सहकारमहर्षी तथा माजी मंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेणापूर येथे सहकारमहर्षी मा. श्री दिलीपरावजी देशमुख चषक २०२२ : भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून याचे उद्घाटन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

उत्तम आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मैदानी स्पर्धांना आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगून आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, “लातूर ग्रामीण मतदार संघामधील मुरुड, रेणापूर येथील क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकाधिक खेळाडू निर्माण होतील. स्थानिक खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे, त्यांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे.”

यावेळी माजी आमदार श्री. त्र्यंबक भिसे, श्री. सर्जेराव मोरे, श्री. अनंतराव देशमुख, बी. व्ही. मोरे, श्री. आबासाहेब पाटील, श्री. प्रमोद जाधव, स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अनिता केंद्रे, श्री. यशवंतराव पाटील, श्री. रमेश सुर्यवंशी, श्री.तुकाराम कोल्हे, श्री. गोविंद पाटील, श्री. प्रवीण पाटील, लालासाहेब चव्हाण, संभाजी रेड्डी, पुजाताई इगे, चंद्रचूड चव्हाण, उद्धव चेपट आदी मान्यवर उपस्थित होते.
