नांदेड : कला, कथक आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून अर्थपूर्ण कार्य उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या Bhavarth Kathak Arts Spaceच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या भार्गवीची Women Entrepreneur म्हणून NSRCEL, IIM Bangalore यांच्या Women Startup Program Incubation Programmeसाठी निवड झाली आहे. भार्गवीच्या या निवडीमुळे भावार्थच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भार्गवीने कलेला केवळ सादरीकरणापुरते मर्यादित न ठेवता, तिच्या माध्यमातून नव्या कल्पना, सर्जनशीलता, शिक्षण आणि सामाजिक-सांस्कृतिक संवादाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भावार्थच्या माध्यमातून कार्य उभे करत आहे. कलाक्षेत्रातील तिची संवेदनशीलता आणि भावार्थ चे co founder अनंत कुलकर्णी यांचा उद्योजकतेतील व्यावसायिक दृष्टिकोन यांची सांगड घालत भावार्थला एक अर्थपूर्ण दिशा देण्याचे काम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

NSRCEL (N S Raghavan Centre for Entrepreneurial Learning), IIM Bangalore यांच्या Women Startup Programमधील Incubation Programmeसाठी झालेली निवड ही भार्गवीच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. सात महिन्यांच्या या Incubation Programmeमध्ये सहभागी होताना तिला Mentoring, Expert Guidance, Bootcamps, Networking आणि Grant Supportच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मार्गदर्शनातून भावार्थच्या संकल्पना अधिक विकसित करण्याबरोबरच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीला व्यापक दिशा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

भार्गवीच्या या यशामागे तिची कल्पकता, सातत्य, मेहनत आणि कलेविषयीची बांधिलकी यांचा मोठा वाटा आहे. एखाद्या कलाविषयक उपक्रमाला संस्थात्मक स्वरूप देत त्याचा व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे. बदलत्या काळातील नव्या संधींचा स्वीकार करत पारंपरिक कलेला आधुनिक व्यासपीठ मिळवून देण्याची धडपड भावार्थच्या कार्यातून दिसून येते.ही निवड केवळ भार्गवीची वैयक्तिक उपलब्धी नसून अनंत कुलकर्णी आणि संपूर्ण भावार्थ टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.
भावार्थच्या प्रवासात प्रत्येक सदस्याने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या, दिलेले योगदान, वेळोवेळी केलेले सहकार्य आणि एकत्रितपणे पाहिलेले स्वप्न यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.छोट्या-छोट्या प्रयत्नांतून मोठे स्वप्न उभे करण्याच्या या प्रवासात भावार्थने आतापर्यंत अनेक अर्थपूर्ण पावले टाकली आहेत. त्यातील NSRCEL–IIM Bangaloreच्या Women Startup Program Incubation Programmeसाठी भार्गवीची निवड हे एक छोटेसे, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे.या संधीच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञ, उद्योजक, मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भावार्थच्या कार्याचा विस्तार आणि भविष्यातील उपक्रमांसाठी नवे मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे.
“भावार्थच्या या प्रवासात वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य, प्रोत्साहन आणि प्रेम देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनापासून आभार मानतो. ही उपलब्धी आमच्या संपूर्ण टीमची आहे आणि पुढील वाटचालीसाठी आम्हाला अधिक ऊर्जा देणारी आहे,” अशी भावना भावार्थच्या टीमने व्यक्त केली.कलेच्या मातीशी नाते जपत नव्या विचारांना आणि उद्योजकतेला जपणाऱ्या भार्गवीच्या या वाटचालीकडे आता एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. कलेतून निर्माण होणाऱ्या शक्यतांना नवी दिशा देत भावार्थची ही वाटचाल अधिक व्यापक आणि समृद्ध होवो, अशा शुभेच्छा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.




