Homeसहकारगत चार वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज का दिले नाही?

गत चार वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज का दिले नाही?

महायुती पँनलचा जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यानां सवाल

निवडणुकीसाठी १९ जागेकरिता ४० जणांनी दाखल केली उमेदवारी

लातूर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक कारभार करत असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा बँकेच्या चेअरमेनसह संचालक मंडळाने गत ४ वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज का दिले नाही याचे उत्तर देण्याचे आव्हान देवून गत १० वर्षात केवळ एकदाच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

आगामी १५ दिवसात १५ प्रश्नांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणार असे सांगून महायुतीच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणुकीसाठी १९ जागेकरिता ४० जणांनी उमेदवारी दाखल केल्याची माहिती भाजप युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या माध्यमातून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी १९ जणांनी ४० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या नंतर अरविंद पाटील निलंगेकर, ऋषिकेश कराड, अबोली पाटील, भगवान पाटील तळेगावकर, कपिल माकणे, धर्मपाल देवशेट्टे आदी प्रसार माध्यमांना सामोरे गेले. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गत ४ वर्षात एकाही शेतकऱ्याला पिक कर्ज दिल्या नसल्याचे स्पष्ट करत बँकेचे चेअरमन व त्यांच्या संचालक मंडळाने केवळ शेतकऱ्याच्या हितासाठी जिल्हा बँक कार्यात असल्याचा दावा करत असल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे हित करत असल्याचे सांगून केवळ आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित असलेल्या उद्योगांना शेतकरी सभासदांचा पैसा कर्ज दिला असल्याचा आरोप करण्यात आला. बँकेचे चेअरमेन यांनी आपल्याच भावाच्या कारखान्याला १३० कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या आधारावर दिले आहे असा प्रश्न उपस्थित करून जर आपला कारभार पारदर्शक व योग्य असेल तर आरबीआयने जिल्हा बँकेस नोटीस देवून ८ लाखाचा दंड का केला याचे उत्तर बँकेच्या चेअरमेनने द्यावे असे आव्हान अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिले.

जिल्हा बँकेचा भोंगळ कारभार हाच आपला निवडणुक अजेंडा असल्याचे सांगून अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले कि आज या कारभाराबाबत आम्ही २ प्रश्न विचारलेले असून आमच्याकडे १५ प्रश्नांची प्रश्नावली असल्याचे सांगितले. आज विचारण्यात आलेल्या २ प्रश्नांची उत्तरे जिल्हा बँकेच्या चेअरमेननी द्यावे असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आगामी काळात इतर प्रश्न उपस्थित केले जातील असे सांगितले. आपला कारभार योग्य आणि पारदर्शक असेल तर निवडणुकीला सामोरे जाण्याची भीती का वाटते असे सांगून विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी बँकेतील सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र शेतकरी आणि सभासद हितासाठी महायुती बांधील असल्याने या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १९ जागेकरिता ४० जणांनी उमेदवारी दाखल केली असल्याची माहिती अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments