25.1 C
Pune
Sunday, May 3, 2026
Homeआरोग्य वार्तापोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग शिबिरात ६९ रुग्णांची तपासणी

पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग शिबिरात ६९ रुग्णांची तपासणी

पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत अस्थिरोग शिबिरात ६९ रुग्णांची तपासणी – उपचार

लातूर : महाराष्ट्र दिन तसेच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन,आयएमए लातूर व पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत अस्थिरोग शिबिरात ६९ रुग्णांची तपासणी – उपचार करण्यात आले.

तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांसाठी खोरी गल्ली परिसरातील विरंगुळा केंद्रात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिराचे उदघाटन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती , लातूर ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. गिरीश कोरे, सचिव डॉ. मन्सूर भोसगे, डॉ. चेतन सारडा, डॉ. द्वारकादास तापडिया, डॉ. इम्रान कुरेशी, श्याम धूत, प्रसाद उदगीरकर, पस्तापुरे , विजय रांदड, जितू बजाज, रामेश्वर सोमाणी, संजीव भार्गव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पोद्दार हॉस्पिटल आणि मोफत अस्थिरोग शिबीर हे जणू आता लातूरकरांसाठी एक अद्वितीय समिकरणच बनले आहे. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आजचे हे १७४ वे मोफत शिबीर होते. आपण समाजाचेही काही देणे लागतो. ते अशा शिबिराच्या माध्यमातून केलेल्या रुग्णसेवेने साध्य होते, या विचाराने डॉ.अशोक पोद्दार मोफत रुग्णसेवेचा हा यज्ञ चालविण्याचे काम करत असतात.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. पाच सहा दिवस चालणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. राहुलकुमार मीना यांनी आपल्या मनोगतात रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन आपले आयुष्य निरोगी जगण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.

पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग शिबिराबाबतची ख्याती आपण ऐकून असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अशोक पोद्दार यांनी आपल्या प्रास्ताविकात हा उपक्रम मागच्या नऊ वर्षांपासून राबविला जात असल्याचे सांगितले. सहा वर्ष बेस्ट उपक्रमाच्या आयोजनाचे पारितोषिकही मिळाल्याचे सांगितले. राज्यातील ३० हुन अधिक जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम डॉ. पराग संचेती यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येतात. आपल्या या कार्याची दखल ऑल इंडिया ऑर्थोपेडिक असो.च्या वार्षिक सोहळ्यातही घेतली गेली असून त्याचाही पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले. पोद्दार हॉस्पिटलच्या या मोफत अस्थिरोग शिबिरात एकूण ६९ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये ५७ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची मोफत तपासणी करण्यात आली.यावेळी २८ रुग्णांचे एक्सरे, १८ रुग्णांची रक्त तपासणी तर ३२ रुग्णांची फिजिओथेरपी करण्यात आली. सर्व रुग्णांना मोफत औषधींचेही वितरण करण्यात आले. डॉ.अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव,डॉ. कपिल धुमुरे, डॉ. सिद्रामप्पा भोसगे ,डॉ. प्रशांत अंभोरे यांनी ऋणांची तपासणी केली.

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिनाचे औचित्य साधून लातूर शहरातील खोरी गल्ली परिसरातील ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रात हाडांच्या आजारांविषयी कार्यशाळाही आयोजित केली गेली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. काशिनाथराव सलगर हे होते. या वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. गिरीश कोरे अध्यक्ष ऑर्थोपेडिक असोसिएशनचे यांनी तसेच डॉ. मन्सूर भोसगे व डॉ.विक्रम सूर्यवंशी या सर्वांनी ज्येष्ठांना ठिसुळ हाडाच्या बाबतीत व हाडांची घेण्यासाठी काळजी याबाबत आहार व्यायाम व काळजी याबाबत खूप छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस तिन्ही डॉक्टरांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकाश निला, रमेश भोयरेकर, वसंत बेंडे,शहाजी घाडगे, डॉ. भास्कर बोरगावकर आदींनी परिश्रम घेतले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.-

———————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]