Homeसहकारलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लातूर ( माध्यम वृत्तसेवा):-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्नलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब व राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

शेतकरी सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या ध्येयातून लातूर जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.सभेत बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना सातत्याने झालेली विक्रमी कर्जवसुली, ९,२०० कोटी रुपयांची उलाढाल आणि सहकार क्षेत्रात प्राप्त ४६ बँकिंग पुरस्कारांचा गौरव उल्लेख करण्यात आला.

शेतकरी हिताला प्राधान्य देत नव्या शेतकरी सभासदांना कर्ज, ‘शुभमंगल योजने’तून शून्य व्याजाने कर्ज तसेच कर्जमर्यादा वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आल्या.बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के बोनस आणि मूळ पगारात १० टक्के वाढ, तर गटसचिवांना २५ टक्के बोनस देण्याची घोषणा करण्यात आली.

आगामी काळात बँकेची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्ह्यात आणखी ५० ते ५५ नवीन शाखांचा विस्तार करण्याचे उद्दिष्टही मांडण्यात आले.शेतकरी सुख, सभासदांचा विश्वास आणि ग्रामीण विकास… हीच लातूर जिल्हा बँकेची खरी बांधिलकी असून हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत.

ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दमदार वाटचाललातूर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूरने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना १७ ऑगस्ट १९८४ रोजी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनातून स्वतंत्रपणे झाली. स्थापनेपासूनच बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शेतकरी, लघु व्यावसायिक, महिला बचत गट तसेच ग्रामीण भागातील विविध घटकांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

बँकेने आपल्या कार्यक्षेत्रात सहकार चळवळीचा विस्तार करत ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, ग्राहकाभिमुख सेवा आणि आर्थिक शिस्त यामुळे बँकेने सहकार क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. भविष्यातही ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिक प्रभावी आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

स्थापनेपासूनच्या प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक म्हणून आपली ओळख निर्माण केली असून, ग्रामीण विकासाची ही वाटचाल भविष्यातही अधिक गतिमान करण्याचे उद्दिष्ट बँकेसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments