30.8 C
Pune
Wednesday, May 13, 2026
Home ठळक बातम्या साहित्य संमेलनासाठी निवड

साहित्य संमेलनासाठी निवड

0
448

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्यात लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या पाच बाललेखकांची निवड

दोन बालकवी तर तीन बालकथाकारांचे सादरीकरण

उदगीर :

उदगीर येथे संपन्न होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार मेळावा या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या कविता व कथा मागवण्यात आल्या होत्या .संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या साहित्यातून उदगीर येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या पाच बाललेखकांच्या साहित्याची निवड झाली आहे.यामध्ये चि. ऋषी कनाडे वर्ग ९ वी व इ.६वी कु.दिव्या कांबळे या दोन बालकवीच्या कविता तसेच कु.अंबिका ढोबळे इ.८वी चि.प्राजक्ता मानसपूरे इ.१० वी व कु.वैभवी पाटील इ ९ वी
या तीन बालकथाकाराच्या कथेची अशा पाच बालसाहित्यिकांना संमेलनाच्या संयोजन समितीकडून निमंत्रित करण्यात आले आहे.


निवड झालेले बाललेखक अनेक बालकवीसंमेलनात व शाळेतील अनेक उपक्रमात सातत्याने सहभागी होतात . ‘पूणे येथून प्रकाशित होणाऱ्या शिक्षणविवेक मासिकातूनच आम्ही लिहते झालो’ ,अशी प्रतिक्रिया वरील बालसाहित्यिकांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह मा.श्री नितीन शेटे, सहकार्यवाह मा.प्रा.श्री चंद्रकांत मुळे, मा.डॉ.हेमंत वैद्य, मा.डॉ.कल्पना ताई चौसाळकर,विद्यासभेचे अध्यक्ष मा.श्री किरण भावठाणकर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मा.श्री.मधूकरराव वट्टमवार ,कार्यवाह मा.श्री.शंकरराव लासूणे,शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.संतोषराव कुलकर्णी ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी , उप मु. अ. अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले , शिक्षण विवेक प्रमुख अनिता यलमटे ,स्मिता मेहकरकर,प्रिती शेंडे ,अनिता मूळखेडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]