नाथ संस्थानात संकष्ट चतुर्थी निमित्त अथर्वशीर्ष पठण व गणेश याग संपन्न

औसा;:–श्री सच्चिदानंद सद्गुरु विरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा येथील नाथ मंदिरात पहाटे पासून सकाळी 9 पर्यंत श्री अथर्वशीर्ष पाठाचे सामूहिक पठण सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या अधिपत्यात होऊन श्री सिद्धिविनायकाची आरती करण्यात आली. गणेश याग पूर्णाहुती संपन्न !………………..

.

सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष गणेश यास आरंभ झाला ब्रम्हव्रंदाच्या मंत्रघोषात गणेश याग आहुती व सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुति झाली यानंतर उपस्थित शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली गणपतीची उपासना श्री गहिनीनाथ महाराज हे अखंडपणे नाथ संस्थानात करतात संस्थांनचे द्वितीय सतपुरुष सद्गुरु मल्लाप्पा महाराज यांनी नाथ मंदिरात स्थापित केलेल्या श्री सिद्धिविनायकाची ही उपासना लहान थोर अबाल वृद्ध विविध जातीपंथातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसहगणपतीची साधना करू इच्छिणारे शंभराहून अधिक भक्त भाविक पहाटेच्या अथर्वशीर्ष पाठाला आवर्जून उपस्थित राहून गणेश अथर्वशीर्ष पाठ करतात.

आजवर लाखाहून अधिक ज्यांना वेद माहित नाही अशांनी अथर्वशीर्ष शिकून पाठाचा व गणेशायागाचा लाभ घेतला आहे.हा गणेश याग वे.शा.स. श्री पुरुषोत्तमाचार्य जोशी निटुरकर यांच्या मुख्य पोरहित्यात व श्री बालाजी देव,श्री गणेश आयाचित देव , यांच्या वेदमंत्र घोषात गणेशागाचा विधी पार पडला. तर महिन्याच्या चतुर्थीला पंचक्रोशीतील गणेश उपासना करणारे असंख्य भक्त अथर्वशीर्ष पठणास आणि गणेश यागाच्या अहोती सोहळ्यात श्रद्धेने सहभागी होतात.

Previous article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments