Homeउद्योग*नव्या जोमाने पूर्णवादी बॅंकेची नवनिर्मिती करू- डाॅ.लक्ष्मीकात पारनेरकर*

*नव्या जोमाने पूर्णवादी बॅंकेची नवनिर्मिती करू- डाॅ.लक्ष्मीकात पारनेरकर*

लातूर :
मा. डाॅ.अरूणजी निरंतर (अध्यक्ष पूर्णवादी बॅंक )व शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.डाॅ.लक्ष्मीकातजी पारनेरकर यांच्या वतीने लातूर मध्ये पूर्णवादी बॅंकेचे सभासद खातेदारांसाठी पूर्णांनंद मंगल कार्यालयात सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नव्याजोमाने पूर्णवादी बॅंकेची नवनिर्मिती करू असे उदगार मा.डाॅ. लक्ष्मीकातजी पारनेरकर यांनी पूर्णवादी बॅंकेच्या वतीने आयोजीत संवाद कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप भाषणात काढले.

यावेळी व्यासपीठावर मा.डाॅ.लक्ष्मीकांतजी पारनेरकर बॅंकेचे विद्यमान संचालक ॲड.अमितजी देशपांडे वसमतकर, चॅर्टर अकौंटंट जगदिश शिरापूरकर, लातूर गंजगोलाई शाखेचे स्थानिक सल्लागार अशोकजी गोविंदपूरकर, शिवाजी चौक शाखेचे शाखेचे स्थानिक सल्लागार अभि.अतुल ठोंबरे, पूर्णवाद परिवाराच्या वतीने अभि.देवीकुमार पाठक उपस्थित होते.
लातूरच्या सभासदांचे पूर्णवादी बॅंकेसाठीच्या योगदानाचा विचार करून लातूर मधील एका सभासदाला संचालक मंडळात स्थान मिळावे अशा अपेक्षा अशोक गोविंदपूरकर व अतुल ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.लातूरच्या सभासदाचा निश्चित विचार केला जाईल असे अश्वासन मा.डाॅ.लक्ष्मीकांतजी पारनेरकर यांनी आपल्या भाषणात दिले.


संवाद बैठकीचे प्रास्ताविक ॲड अमितजी देशपांडे यांनी केले.अतुल ठोंबरे व अशोक गोविंदपूर यांनी मनोगत व्यक्त केले.मा.डाॅ.लक्ष्मीकांतजी पारनेरकर यांना अध्यक्षीय समारोप केला. उपस्थित सभासदांमधुन श्री मधुकर पात्रेसर यांनी मनोगत व्यक्त केले.श्री जगदीश शिरापूरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
ॲड कलिदासराव देशपांडे,सुनिल अयाचित,अजित म्हैसेकर,ॲड अराध्य,सिए संजय बोरा,मोहन परदेशी,ॲड पांचाळ,दादा बिलोलीकर,ॲड विश्वासराव देशमुख,अभियंता संतोष कुलकर्णी, अभि. प्रशांत भोयरेकर, अभि.मेतकुटे , विशाल पाठक सह लातूर मधील सभासद, ग्राहक,पूर्णवाद परिवारतील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments