भाजपाचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
लातूर दि. ३१ – आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात अग्रेसर राहून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे, शेतकरी, शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करणारे भाजपाचे नेते लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्ताने लातूर येथील ‘प्रयाग” या निवासस्थानी भाजपासह विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी समाज माध्यम व दुरध्वनीच्या माध्यमातून जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

आ. कराड मित्रपरिवाराच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अंगणवाडीतील कार्यकर्ती, मदतनीस आणि आशा सेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अभिष्टचिंतन सोहळ्यास ग्रामीण भागातील नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेक गावात ग्रामदैवतांची महापूजा करुन रमेशअपांना दीर्घाष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांच्या वतीने महापूजा, आरती व प्रार्थना करण्यात आली. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान मिळवून देणारे, हजारो कुटूंबांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे आणि आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे भाजपाचे नेते लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कार्यसम्राट आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांचा शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी जन्मदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जन्म दिनाच्या पूर्व संध्येला २९ मे रोजी रात्री भादा सर्कल मधील मौजे समदर्गा येथे जाहीर कीर्तन झाले. या कीर्तनास हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आ. रमेशअप्पा कराड मित्र परिवाराच्या वतीने लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील एमआयटी परिसरातील “प्रयाग” या निवासस्थानी अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयाला लातूर ग्रामीण मतदार संघातील नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील भाजपा व विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी दिवसभरात आ. रमेशअप्पा कराड यांचा यथोचित सत्कार केला, पुष्पगुच्छ देवून, मिठाई भरवून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अभिष्ठचिंतन करण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण मतदार संघातील विविध गावागावातील महिला भजनी मंडळ उत्स्फुर्तपणे अभिष्ठचिंतन सोहळ्यात सहभागी होवून भजनी मंडळातील महिलांनी आप्पासाहेबांचा यशोचित सत्कार करुन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बंजारा समाजातील पाचशे महिलांना अशोक राठोड यांच्या वतीने पारंपारीक बंजारा पोशाख वाटप करण्यात आला. शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली. सकाळच्या वेळी रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणूका मातेसह लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक गावागावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांचा अभिषेक, महापूजा व आरती करून आ. रमेशअप्पा कराड यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.

तर अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर ठिकाणच्या रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांना जन्मदिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री नितेश राणे, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजीमंत्री आ. संजय बनसोडे, खा. धनंजय महाडिक, सुरजितसिंह ठाकुर, आ. चित्राताई वाघ, आ. प्रसाद लाड, आ. निरंजन डावखरे, आ. अमित गोरखे, आ. संदिप जोशी, आ. शंकर जगताप, आ. सचिन शेट्टी, आ. पराग अळवणी, आ. सुरेश खाडे, आ. मिहीर कोटेचा, आ. प्रविण दटके, आ. विक्रम काळे, आ. सुधीर पाटील, आ. नारायण कुचे, आ. प्रताप अडसर, आ. सुरेश धस, आ. प्रशांत ठाकूर, आ. चैनसुख संचेती, आ. संतोष दानवे, आ. संजय केणेकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. श्वेता महाले, आ. समाधान औताडे, आ. राजन नाईक, आ. महेश लांडगे, आ. श्रीजया चव्हाण, प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन, गजानन घुगे, राम सातपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

जन्मदिनानिमित्ताने आ. रमेशअप्पा कराड यांना श्री. अघोर महाराज व इतर त्यांच्या सहकार्यांनी मंत्रोपचारात शुभाशिर्वाद दिले. अभिष्ठचिंतन कार्यक्रम प्रसंगी तुळशीरामअण्णा कराड, काशिरामनाना कराड, सौ. संजिवनीताई कराड, राजेश कराड, सौ. शुभांगी कराड, विहार बोडके, सौ. ऋतुजा बोडके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ऋशिकेशदादा कराड, पृथ्वीराज कराड, रणवीर कराड यांच्यासह कराड परिवारातील अनेक सदस्य होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.

अभिष्ठचिंतन सोहळ्यात आ. रमेशअप्पा कराड यांचे आ. अभिमन्यू पवार, शिवसेनेचे अॅड. बळवंत जाधव, प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, गणेशदादा हाके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, महिला बालकल्याण सभापती शिवकन्या गोडभरले, जिप गटनेते रामचंद्र तिरुके, निलंगा पस सभापती डॉ. सुनिता वाघमारे, रेणापूर सभापती मोनिका सुर्यवंशी, देवणी सभापती अंकिता पाटील शिरुर अनंतपाळ सभापती संजय सुर्यवंशी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष रमेशभाऊ राठी, ललितभाई शहा, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन विशाल राठी, जिप सदस्य महादेव साळुंके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, हभप उद्धवबापू आपेगावकर, प्रदेश राष्ट्रवादीचे बबन भोसले, भाजपाचे दिलीपराव देशमुख, शैलेश लाहोटी, विक्रमकाका शिंदे, प्रदिप पाटील खंडापूरकर, युवा भिमसेनेचे पंकज काटे, शिवसेनेचे संतोष बेंबडे, भागवत सोट, रमाकांतबापू मुंडे, अशोककाका केंद्रे, शिवाजी केंद्रे, श्रीहरी मुंडे, त्र्यंबकआबा गुट्टे, वसंतराव डिघोळे, नाथसिंह देशमुख, बापूराव राठोड, अविनाश कोळी, सुभाष जाधव, स्वप्नील व्हते, देविदास काळे, दिग्विजय काथवटे, रागिणी यादव, प्रदिप मोरे, विक्रमसिंह चौहान, रोहिदास वाघमारे, बापूराव चामले, पप्पु गायकवाड, भारत चामले, सुशिलकुमार बाजपेयी, सुनिल उटगे, किरण उटगे, मुक्तेश्वर वाघदरे, दत्ताआबा पाटील अंबाजोगाईकर, राजाभाऊ औताडे, कमलाकर कोंपले, अच्युत गंगणे, भागवत गुट्टे, राजकुमार कलमे, सज्जन लोण्णाळे, गोविंद चिलकुरे, बालासाहेब शेप, बापूराव केंद्रे, रामेश्वर बद्दर, अरुण समुद्रे, जयप्रकाश दगडे, चंद्रकांत झरीकुंटे, शशिकांत पाटील, गोपाळ कुळकर्णी, जावेद शेख, संजय देशपांडे, हारुण सय्यद, डी. एन. केंद्रे, विजय क्षिरसागर, गुंडाप्पा पाटील, धर्मपाल देवशेट्टे, अनंत गायकवाड, गिरीष पाटील, गणेश गवारे, दिपाताई गित्ते, अर्जुन जाधव, जगदिश कुलकर्णी, वैशाली लोंढे, क्रेडाईचे उदय पाटील, संतोष हात्ते, महेश नावंदर, जयकांत गित्ते, गोपाळ जोशी, अभिजित देशपांदे, किशोर कुलकर्णी, प्रकाश सोनवणे, संतोष वाघमारे, सुशांत पाटील, महेश पाटील, शंकर रोडगे, चंद्रभान जाधव, प्रकाश पाटील, रत्नाकर औसेकर, बाबू खंदाडे, राजेंद्र लोदगेकर, व्यंकट पन्हाळे, रोहिणी देशमुख, अभिमान वायबसे, बाबाराव बारवाड, राजपाल भंडे, काशिनाथ गरीबे, संजय अग्रवाल, शिवम देवशेटवार, मस्तान शेख, अॅड. अविनाश इरपतगिरे, अॅड. मनोज कराड, अॅड. किरण बडे, अॅड. शिवाजी नागरगोजे, अॅड. केदार, अॅड. मोहन सिरसाट, पद्माकर चिंचोलकर, महेंद्र गोडभरले, अभिषेक अकनगिरे, अनिल भिसे, पांडूरंग बालवाड, अॅड. दशरथ सरवदे, उद्धव काळे, सुरज शिंदे, प्रताप पाटील, शरद दरेकर, राजकिरण साठे, बन्सी भिसे, वैभव सापसोड, डॉ. बाबासाहेब घुले, गणेश हेड्डा, महेंद्र जाधवर, प्रा. रघुनाथ केंद्रे, सुनिल होनराव, हणमंत देवकते, संतोष कोटलवार, बालासाहेब गुट्टे, जयंत गंगणे महाराज, दिलीप धोत्रे, विष्णु गोरे, ऋषिकेश बद्दे, व्यंकटराव आनामे मामा, विष्णु मदने, रवि सुर्यवंशी, नागनाथ गित्ते, सुभाष धोत्रे, अमोल पाटील, बबन चोले, अमर भोसले, एकनाथ काळे, सुनिल सुर्यवंशी, भालचंद्र सुर्यवंशी, डॉ. बोरगावकर, शिवासिंह सिसोदिया, श्रद्धा जगताप, हेमा येळे, पुजा कांबळे, शितल पाटील, ललिता कांबळे, अनुसया फड, सुरेखा पुरी, जया काबरा, शिला आचार्य, लता भोसले, शृती सवई, सविता खाडप, जणाबाई साखरे, उषा रोडगे, सुरेखा मुळे, सिमा करपे, कल्पना मोरे, संजय विरुळे, वसंत करमुडे, अॅड. धनराज शिंदे, संजय ठाकूर, गोपाळ पाटील, रमेश पाटील, गोविंद गिरी, युवराज पाटील, श्रीकृष्ण जाधव, उमेश सोमानी, ज्ञानोबा भिसे, दिपक वांगसकर, अनंत चव्हाण, मुन्ना गुरले, विजय चव्हाण, प्रा. धनंजय बिक्कड, विश्वास कावळे, अॅड. श्रीकांत बोराडे, काशीनाथ ढगे, अच्युत कातळे, दत्ता सरवदे, महेश गाडे, अशोक राठोड, उत्तम चव्हाण, महेश कणसे, लक्ष्मण यादव, संजय डोंगरे, धम्मानंद घोडके, नारायण राठोड, रविंद्र नागरगोजे, माधव घुले, श्रीमंत नागरगोजे, संतोष चव्हाण, किशन क्षिरसागर, लहु शेवाळे, भागवत गित्ते, राजु आलापुरे, पार्वती सोमवंशी, बालाजी दुटाळ, शंकर चव्हाण, प्रशांत शिंदे, श्रीकांत कुंभार, सिद्धेश्वर मामडगे, माणिक आलुरे, बाबुराव कस्तुरे, भिमराव मुंडे, श्रीनिवास उगिले, विठ्ठल बोडके, प्रविण कोतवाड, मनसेचे बाळासाहेब मुंडे, भागवत शिंदे, नंदकुमार साळुंके, अमोल गित्ते, अजित पाटील, राज जाधव, बळवंत कराड, प्रकाश जाधव, राहुल नागरगोजे, रामानंद मुंडे, बाबा भिसे, प्रशांत मोटे, पिंटू डोंगरे, नरसिंग सुरवसे, दिलीप पाटील, लक्ष्मण खलंग्रे, गोविंद मुंडे, किरण मुंडे, समाधान कदम, बालाजी गवळी, वैजनाथ हाराळे, हणमंत गव्हाणे, पुंडलिक बेंबडे, सुभाष राठोड, संतोष राठोड, बालासाहेब कदम, दिलीप चव्हाण, भैरवनाथ पिसाळ, ईश्वर बुलबुले, जगदिश माळी, ज्ञानेश्वर जुगल, नरसिंग यलगटे, नवनाथ मुरकुटे, यांच्यासह लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावातील वाडीवस्तीतील भाजपा व इतर विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आदींनी आ. रमेशअप्पा कराड यांना प्रत्यक्ष भेटून यथोचित सत्कार करुन जन्मदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.




