लातूरच्या विकासासाठी नगरसेवकांचा महापौरांना घेराव
विरोधी पक्षनेते देविदास काळे यांचा नेतृत्वात भाजपा आक्रमक
लातूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेत सत्तेत येऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला असला तरी अद्यापपर्यंत सत्ताधारी काँग्रेसकडून शहराच्या विकासाला गती देणारे कोणतेच ठोस निर्णय झालेले नाहीत. विशेष म्हणजे सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अधिकाºयांचीही मनमानी वाढलेली आहे. यामुळे शहराचा विकास रखडला असून लातूरची जनता सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भोवºयात भरडली जात आहे. यामुळेच लातूरच्या विकासाला गती मिळावी याकरिता विरोधी पक्षनेते देविदास काळे यांच्या नेतृत्वात भाजपा नगरसेवकांना आक्रमक भूमिका घेत महापौरांना घेराव घातला होता. शहरातील विकासकामे मार्गी न लागल्यास आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी दिला.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अनेक आश्वासने देत मनपाची सत्ता हस्तगत केली. मात्र, सत्तेत येवून तीन महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला गेला असला तरी अद्यापपर्यंत सत्ताधारी काँग्रेसने विकास कामांबाबत कोणतीही ठोस भूमिका किंवा निर्णय घेतले नाहीत. याउलट सुरु असलेल्या विकासकामांना स्थगिती देत शहराच्या विकासात खोडा घातलेला आहे. सत्ताधाºयांना लातूरचे प्रश्न दिसत नसल्याने शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मिळणेही दुरापास्त होत आहे. जलाशयात मुबलक पाणीसाठा असूनही लातूरकरांना वेळेवर आणि स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे नियोजन केवळ कागदावरच होत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूकीचीकोंडी होवून वाहनधारक व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मोकाट कुत्र्यांनी एका तरूणाचा बळी घेतला तरी अद्यापर्यंत मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन व सत्ताधाºयांना अपयश आले आहे. पावसाळा तोंडावर आलेलाअसतानाही शहरातील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे. नगरसेवकांकडून खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची मागणी होत असून तीही पूर्ण होत नाही. मनपातील प्रशासक राज जावून लोकनियुक्त सभागृहात अस्तित्वात आले असलेतरी अद्यापपर्यंत अधिकाºयांची मनमानी सुरुच आहे. सत्ताधाºयांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अधिकारी त्यांच्या मनात येतील तीच कामे मार्गी लावत नगरसेवकांच्या सूचनांना किंवा मागणींना केराची टोपली दाखवत आहेत. या सर्व बाबींवर सर्वसामान्य लातूरकर भरडला जात असून शहरातील विकास कामेही ठप्प आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षनेते देविदास काळे यांच्या नेतृत्वात भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घालत त्यांना जाब विचारला. लवकरात लवकर विकास कामेमार्गी न लागल्यास यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देविदास काळे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.




