Homeसाहित्यसाहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी लातूरात बैठक

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी लातूरात बैठक

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सहविचार सभेचे लातुरात आयोजन..

उदगीर :

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २२,२३ व २४ एप्रिल रोजी उदगीर येथे होऊ घातले आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातुरातील पूर्णानंद मंगल कार्यालय ,सावेवाडी लातूर या ठिकाणी रविवार दि.२७ फेब्रु. २०२२ रोजी सायं.ठीक ४:०० वा. सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे . या सहविचार सभेस ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ .सूर्यनारायण रणसुभे , डॉ.नागोराव कुंभार,डाॅ.शेषराव मोहिते व कवी प्रा.फ.म.शहाजिंदे हे उपस्थित राहणार आहेत .
तरी या सहविचार सभेस लातुरातील सर्व साहित्यिकांनी, वाचकांनी व माय मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे साहेब, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा उदगीरच्या मसाप शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, संस्था सचिव प्रा.मनोहर पटवारी, साहित्य संमेलनाचे समन्वयक दिनेश सास्तूरकर यांनी केले आहे.
तसेच या सहविचार सभेला उपस्थित रहावे अशी विनंती ही मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव सचिव डॉ दुष्यंत कटारे, शब्दपंढरी प्रतिष्ठान लातूरचे कवीवर्य श्री योगीराज माने, अक्षरवेल प्रतिष्ठान चे कवीवर्य रमेश चिल्ले,जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष श्री विवेक सौताडेकर ,हिंदी साहित्य परिषद लातूरचे अध्यक्ष डॉ सतीश यादव, संत कबीर प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष डॉ रणजीत जाधव, काव्यप्रेमी शिक्षक मंच लातूर आदींनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments