“जनसंपर्कातून जनविश्वास जपणारा नेता”
जनतेसाठी दरबार भरवणारा आमदार रमेशअप्पा कराड
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत बहाद्दर मतदारांनी ऐतिहासिक नवा इतिहास घडविला मा. रमेशअप्पा कराड साहेब यांना विधानसभेत पाठवून जनतेनी जनहितासाठी नेता निवडला. आमदार झाल्याने त्यांच्यात कसलाही बदल झाला नाही आजच्या बदलत्या काळात एकमेकांचा संवाद कमी होत असताना रमेशअप्पा मात्र सर्वसामान्यांच्या थेट संपर्कात आहेत. संवाद कार्यालयात दिवसभर भेटण्याकरिता उपलब्ध असतात. त्यांना भेटण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही हे विशेष.

लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब याच भावनेतून त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला. जनता दरबारातून जनतेचे प्रश्न मार्गी लावले. गावा गावात, वाडीवस्तीत विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून देऊन गाव खेड्यात विकास काय असतो हे दाखवून दिले दिले. सामान्य कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळवून देणारे संघर्षशील नेतृत्व मा. आ. रमेशअप्पा कराड साहेब यांचा आज जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !!!…… चंद्रकांत कातळे, रेणापूर.

काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांच्या घामाचे मोल झाले पाहिजे; सर्व सामान्यांना, गोरगरीबांना त्यांचा न्यायहक्क मिळाला पाहिजे यासाठी सतत संघर्ष करणारे आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब या भावनेतून कार्यरत असणारे भाजपाचे नेते मा. रमेशअप्पा कराड साहेब हे जनसामान्यांच्या मनातील संघर्षशील आणि विश्वासपात्र नेते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहाद्दर मतदारांनी ग्रामीण मतदारसंघातून रमेशआप्पांना बहुमताने विजयी करून एक नवा इतिहास घडविला. खऱ्या अर्थाने हा विजय आप्पांचा नव्हे तर सर्वसामान्य अठरापगड गोरगरीब जनतेचा असं म्हटलं तर वावगं ठरणारे नाही.
जनतेनी निवडलेला नेतालातूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला या भागात भाजपाचे काम करणे तसे अवघडच होते, मात्र जिद्दीने जोमाने जिवाभाचे कार्यकर्ते निर्माण करुन त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रस्थापित शक्ति विरुद्ध सतत संघर्ष करत रमेशअप्पा कराड यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करुन भाजपाचे आणि स्वतःचे अस्तित्व उभे केले. आ. रमेशअप्पा यांची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी अनेकवेळा अनुभवायला मिळाली.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मात्र कधीच खचले नाही. “खचले ते आप्पा कसले” पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा त्याच उमेदीने गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कार्यरत राहीले. याचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. जनतेनीच ही निवडणूक हातात घेतली आणि धनशक्ती, एकाधिकारशाही, हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात नवा इतिहास घडविला आणि रमेशआप्पांना विधानसभेत पाठविले. हक्काचा आमदार निवडून आणला. खऱ्या अर्थाने जनतेने जनहितासाठी नेता निवडला असे बोलले तर वावगे ठरणारे नाही.

जनतेच्या कायम संपर्कातएखादा माणूस कुठल्याही पदावर निवडून गेला तर त्याच वागणं, त्याच राहणं, सामान्यांना कमी भेटणं, भेटायचं असेल तर वेळ घ्यावा लागतो असा खूप मोठा बदल झालेला आपणास पहावयास मिळतो. मात्र याला अपवाद ठरले ते रमेशअप्पा कराड. सर्वसामान्याच्या हितासाठी, अडचणीत सापडलेल्या, पिचलेल्या माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता आले पाहिजे याच भावनेतून पदावर असो अथवा नसो रमेशआप्पांचे कार्य गेली वर्षानुवर्ष सुरू आहे. आमदार झाल्यानंतर त्यांच्यात कसलाही बदल झाला नाही उलट ज्या माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला मतदान रुपी आशीर्वाद दिले त्यांचे प्रश्न सोडवता यावेत त्यांच्या अडचणीत मदत करता यावी केवळ यासाठीच संवाद संपर्क कार्यालय सुरू केले.बदलत्या काळात संवाद कमी होत असताना या संवाद कार्यालयाच्या माध्यमातून नियमितपणे सकाळी अकरा पासून रात्री किमान आठ पर्यंत येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधण्याचा रमेशअप्पा प्रयत्न करतात. एवढेच काय तर कधीही रात्री अपरात्री साधा फोन करून कुणीही आप्पाशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो. आप्पांना भेटण्यासाठी कुण्या मध्यस्थीची गरज नाही. थेट सहज भेट होते. संवाद कार्यालयात आलेल्या प्रत्येकाना विचारपूस केली जाते चहापाणी दिले जाते, अडचणी समजून घेऊन लगेच रमेशअप्पा संबंधितांना फोन करून प्रश्नाची सोडवणूक करतात. येणारा प्रत्येकजण रिकाम्या हाताने परत जात नाही. ग्रामीण भागातून आलेल्या सामान्यांना भेटीची अपेक्षा असते चार शब्द बोलण्याची इच्छा असते हे सर्व सहज घडून येत असल्याने सर्वसामान्य माणसात आप्पाबद्दलची आस्था आपुलकी आणि जिव्हाळा अधिकच दृढ होत आहे.
निधी व विकास कामाचे नियोजन
आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक यांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीच्या बाबतीत आजपर्यंत अनेकांना वेगवेगळे अनुभव आले आहेत बरेच जण टक्केवारी शिवाय निधीच देत नाहीत काही लोकप्रतिनिधी तर छुपी गुत्तेदारी करतात मात्र याला रमेशअप्पानी छेद देत आमदार निधी वाटप असो की शासनाकडून एखाद्या योजनेमार्फत मिळालेल्या विकास निधी असेल याबाबतीत गावनिहाय नियोजन करून त्या गावात कुठल्या कामाची गरज आहे त्यानुसार गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र बसून काम कोण करणार हे निश्चित झाल्यास त्या व्यक्तीला निधी दिला जातो त्यानुसार त्या गावात विकासाचे काम होते. यामुळे कामाचा दर्जा, गुणवत्ता दिसून येते. रमेशआप्पांच्या या नियोजनामुळे मतदार संघातील प्रत्येक गावागावात वाडी वस्तीत आमदार निधी अथवा शासनाची कोणती ना कोणती योजना राबविण्यात आली आहे. आजपर्यंतच्या कुठल्याही विकास कामात कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे केवळ याच भावनेतून निष्कलंकपणे विकास कामा कडे लक्ष घालून कार्य केले आहे.
जनता दरबार भरवणारा नेता

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व्यथा आणि अडीअडचणी समजून घेता याव्यात त्यांच्याशी संवाद साधता यावा, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी याकरिता आ. रमेशअप्पा कराड साहेब यांनी जनता दरबार ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली. मतदार संघातील ममदापूर, मुरुड, रेणापूर, भादा व इतर ठिकाणी घेण्यात आलेल्या जनता दरबारास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा, तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि सर्व सामान्य जनता आमने-सामने आल्याने अनेक प्रश्न चर्चा झाली निकाली निघाले. अतिक्रमित शेतरस्ते, वीज प्रश्न, अवैध दारू, रस्त्याचे प्रश्न, पीक विमा, अनुदान, निराधारच्या पगारी, राशन दुकानचे प्रश्न, प्रवासी बस थांबे, घरकुल, स्मशानभूमी, कबाले यासह विविध वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांचा नागरिकांनी या दरबारात पाढा वाचला, गऱ्हाणे मांडले. संबंधित अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर न करता सामान्यांचे प्रश्न सोडवा अशी सूचना करून आडवणूक केली तर माफ करणार नाही असा दम ही त्यांनी दिला. एकूणच सामान्यांच्या प्रश्नासाठी आग्रही राहून दिलासा देण्याचे काम आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे. जनतेसाठी जनता दरबार भरवणारा नेता हीच भावना सामान्य जनतेतून दिसून आली.

मागील काळात झालेल्या विविध निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश आणि सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळवून दिली. केंद्रशासन आणि राज्यशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीतील विविध गावच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून आणला. अनेक कामांना मंजूरी मिळवून घेतली. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत हे खुप दिलासादायक आहे. मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीत आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून विविध मंदिरासमोर बांधण्यात आलेले सभागृह गावकऱ्यांना लक्षवेधी ठरत आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब या भावनेतून काम करत असताना रमेशअप्पांनी जनहिताच्या विकास योजना मंजूर करताना गावागावात, वाडीवस्तीत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. वैयक्तिक लाभाच्या योजना संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात गरजु लाभार्थ्यांना मिळवूण दिल्या मदत केली. या सर्व योजना राबवत असताना जात, धर्म, पंथ, गटतट असा भेदभाव केला नाही यातून “वसुधैव कुटुंबकम्” याचा प्रत्यय दिसून आला.

आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे, राजकारण आणि त्यातून मिळालेली पदे स्वताःसाठी नव्हे तर समाजाला उभे करण्यासाठी, अडचणीत, संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आहेत. याची जाण आणि भान ठेवून भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी समाजसेवेचे ओझे अखंडपणे वाहून नेत आहेत. त्यांचा आज ३० मे रोजी जन्मदिवस या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा. आप्पासाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य कायम पणे अखंड घडत राहो हीच आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना……!!!

चंद्रकांत सुर्यकांत कातळे भारतीय जनता पार्टी, रेणापूर.











