30.8 C
Pune
Saturday, April 18, 2026
Homeराजकीय'नारीशक्ती वंदन' मधून महिलांचे सक्षमीकरण - डॉ अर्चनाताई पाटील

‘नारीशक्ती वंदन’ मधून महिलांचे सक्षमीकरण – डॉ अर्चनाताई पाटील

नारी शक्ती वंदन’ विधेयकास सर्व स्तरातील महिलांचा पाठिंबा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पदयात्रे दरम्यान व्यक्त केले आपले मत

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक पारित करण्यासाठी संसदेत विशेष अधिवेशन बोलावले आहे. यात हे विधेयक पारित होईलच. या विधेयका नुसार संसद व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे .हे विधेयक म्हणजे केवळ आरक्षण नसून महिलांचे सशक्तिकरण आणि महिलांची सत्तेतील भागीदारी वाढवणारे आहे ,असे मत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.

गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गंजगोलाई ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क अशी सर्वपक्षीय महिलांकडून अभिनंदन पदयात्रा काढण्यात आली .याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक पारीत करण्यासाठी संसदेत १६, १७ व १८ एप्रिल रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. यात हे विधेयक पारीत होईलच. या विधेयकानुसार संसद व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. हे विधेयक म्हणजे केवळ महिलांना आरक्षण नसून महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांची सत्तेतील भागिदारी वाढविणारे आहे हे सांगण्यासाठी सर्व स्तरावरील महिलांच्या पद यात्रेचे आयोजन लातूर येथे केले होते.

यावेळी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर चाकूरकर, संजीवनी ताई रमेश आप्पा कराड, लातूर शहर जिल्हा सरचिटणीस रागिनीताई यादव, महिला मोर्चा अध्यक्ष शीतलताई मालू, महिला मोर्चा उपाध्यक्ष मीनाताई गायकवाड त्याचप्रमाणे डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]