लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना
आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिवादन
लातूर दि. ३ – शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत अमूल्य योगदान देणारे, जनसामान्यांचे कार्यकुशल नेतृत्व, सामान्यांच्या हक्कासाठी झगडणारा नेता म्हणून स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे योगदान सदैव स्मरणात राहाणारे असून निःस्वार्थ सेवा, जनहिताच्या कामाची वृत्ती व लोकहिताची बांधिलकी ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे.समाजातील सर्व घटकासाठी काम करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदादा कराड यांनीही युवा मोर्चाच्या सहकार्यांसमवेत पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

अंबाजोगाई रोडवरील आ. कराड यांच्या भाजपा संवाद कार्यालयात अनेकांनी स्व. मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अभिवादन कार्यक्रमास आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह युवानेते ऋषिकेशदादा कराड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवकन्याताई गोडभरले, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, जिप सदस्य महादेव साळुंके, रामलिंग शेरे, तानाजी बिराजदार, उमेश उमापुरे, सौ. कविता गुट्टे, सौ. तुळजाबाई लोंढे, सौ. छायाताई चिंचोलकर, रेणापूर पस उपसभापती शरद दरेकर, प्रा. रामेश्वर बद्दर यांच्यासह भाजपाचे विक्रमकाका शिंदे, नाथसिंह देशमुख, बन्सी भिसे, अनिल भिसे, उद्धव काळे, महेंद्र गोडभरले, पद्माकर चिंचोलकर, प्रताप पाटील, राजकिरण साठे, विजय काळे, अमर चव्हाण, उद्धव फड,
सौ. ललिता कांबळे, सौ. सुरेखा पुरी, अनुसया फड, बाबासाहेब भिसे, रुपेश काळे, बालाजी शिंदे, सतिष कात्रे, भैरवनाथ पिसाळ, आदिनाथ मुळे, गोपाळ पाटील, चंद्रकांत कातळे, अशोक राठोड, दत्ता सरवदे, अॅड. मनोज कराड, ज्ञानोबा भिसे, भागवत गित्ते, हणमंत गव्हाणे, अनंत पाटील, अशोक सावंत, किरण मुंडे, रमाकांत फुलारी, सिद्धेश्वर मामडगे, शिवदास बेद्रे, लक्ष्मण खलंग्रे, भगवान करमुडे, रमेश लहाडे, मेघराज जाधव, शंकर चव्हाण, सचिन लटपटे, अॅड. धनराज शिंदे, सोमनाथ वाघमारे, शुभम खोसे, संजय सुर्यवंशी, महेश सुडे, अक्षय स्वामी, कैलास सावंत, विजय चित्त्ते, रविंद्र नागरगोजे, गुणवंत करंडे, सुधाकर काळे, अजय शेळके, महादेव गुरुशेट्टे, अॅड, रुपेश थोरमोटे, उमेश सोमानी, प्रशांत शिंदे, ओम चप्पे, चंद्रकांत माने, गणेश चव्हाण, उत्तम चव्हाण, नरेश चपटे, श्रीमंत नागरगोजे, नाथराव गित्ते, नारायण राठोड, दिपक पवार, किशन क्षिरसागर, व्यंकट रसाळ, ईश्वर गोटके, केदार जाधव, दत्ता सप्ताळ, किरण इंगळे, संतोष नरवटे, बालाजी गवळी, निखील धुमाळ, गोपाळ पवार, पद्माकर होळकर, लक्ष्मण मुळे, लिंबराज सोमवंशी, धनंजय पवार, महादेव मुळे, राम पटणे, अच्युत इरपे, शाम भोळे, सुभाष राठोड यांच्यासह अनेकजण होते.





