*सांस्कृतिक कार्य विभागाच्या “सावळ्या विठ्ठला” या कार्यक्रमास पुणेकरांचा उदंड प्रतिसाद*
आषाढी वारीचे निमित्त साधून पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेल्या *सावळ्या विठ्ठला* या भक्तिपूर्ण कार्यक्रमामधून पुणेकरांची मनोभावे दाद
पुणे ,(माध्यम वृत्तसेवा ):-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी वारीच्या निमित्ताने *सावळ्या विठ्ठला* या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 26 जुलै 2026 रोजी भरत नाट्य मंदीर पुणे येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमास पुणेकरांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली.या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून अभाचि महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी घाटगे उपजिल्हाधिकारी पुणे , विवेक मुगळीकर सेनि सहाय्यक पुलिस आयुक्त पुणे हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासन प्रतिनिधी म्हणून राजश्री जाधव सहाय्यक संचालक मुंबई आणि जान्हवी जाणकार अधीक्षक सांस्कृतिक कार्य पुणे या उपस्थित होत्या.

उद्घाटक आणि अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाऊले चालती पंढरीची वाट,सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, देव माझा विठू सावळा , नामाचे भजन पांडुरंग ध्यान ,क्षणभर उघड नयन देवा , विठ्ठल रखुमाई, हरिभजनावीन काळ घालवू नको रे,मेघांच्या पालख्या आल्या आषाढीस अशी अवीट गोडीची गाणी शेफाली कुलकर्णी ,सागर जाधव आणि रसिका जोशी आणि साई प्रसाद यांनी गायली . संवादक म्हणून नीरजा आपटे व आनंदीविकास होतेच पण संगीतकार दशरथ पुजारी यांच्या शिष्या संगीतकार आनंदी विकास यांनी त्यांच्या काही गाण्यांचे ,पुजारीजी यांच्या सहवासातून अनुभवलेले काही आठवणीतील किस्से सांगून सभागृहात वेगळ्याच आनंद लहरी निर्माण केल्या .
प्रत्येक वादकानी अतिशय कसून आणि अभ्यासपूर्ण अशी साथ गायकाना दिली वादकांच्या मध्ये अपूर्व द्रविड विकास देशमुख , आनंद टाकळकर ,धवल जोशी ,अक्षय शेवडे , अथर्व कुलकर्णी ,मंदार गोडसे साथीला होते .. या कार्यक्रमातून अभंग, भक्तीरचना सादर करण्यात आल्या . या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे संगीतकार दशरथ पुजारी आणि त्यांच्या संगीतकार म्हणून शिष्य असलेल्या आनंदीविकास यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना समाविष्ट होत्या केवळ दोन रचना वेगळ्या संगीतकारांच्या होत्या. “सावळ्या विठ्ठला” या संगीतकार आनंदी विकास यांनी मांडलेल्या संकल्पनेतून व संगीतातून अध्यात्म, भक्ती ,भाव यांचा सुंदर संगम साकारण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत कलावंतांचा सत्कार करण्यात आला आणि सांगीतिक कार्याच्या परंपरेचे महत्त्व दिले गेले. कार्यक्रमात गायक कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि बहुतांश गाण्यांना वन्स मोर मिळत गेला आणि रसिक नंतर एवढे मंत्रामुग्ध झाले कि अनेक दर्जेदार गाणी सादर करणाऱ्या गायक गायिका यांच्या अभंगावर रसिकांनी ठेका धरत विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषणे संपूर्ण सभागृह भक्तीमय झालेसांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या यांच्या संकल्पनेतून व तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी व श्रीराम पांडे सांस्कृतिक संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सूंदर सादरीकरण, प्रभावी रंगमंच व्यवस्था, सभागृह परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्मिती व अचूक नियोजनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे पुण्यामधील अध्यात्मिक वर्ग, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, तरुण वर्ग व इतर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.




