Homeमहत्त्वाच्या घडामोडीराष्ट्रीय शल्यचिकित्सक दिनानिमित्त लातूरमध्ये भव्य रक्तदान शिबीर

राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिनानिमित्त लातूरमध्ये भव्य रक्तदान शिबीर

राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिनानिमित्त लातूरमध्ये भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यांना हेल्मेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन

लातूर / माध्यम वृत्तसेवा: राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिनानिमित्त असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (ASI), महाराष्ट्र राज्य शाखा (MASI), लातूर सर्जिकल सोसायटी (LSS) आणि रोटरी क्लब मिडटाऊन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य रक्तदान शिबीर”चे आयोजन रविवार दि. 7 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लातूर महानगरपालिका शेजारी असलेल्या डॉ. एस. बी. गुगळे मेमोरियल हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे.

एक थेंब रक्त अनेकांचे जीवन वाचवू शकते, तसेच हेल्मेटचा वापर अपघात जीव वाचवतो, असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिनानिमित्त आयोजीत भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यांना हेल्मेट वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन खा. डॉ. शिवाजीराव काळगे, EC, ASI डॉ. राजेंद्र शिंदे, EC, MASI डॉ. दिपक गुगळे, MASI चे अध्यक्ष डॉ. आनंद कामत, EC, ASI डॉ. राजेंद्र गणेशीवाल, DG, RI Dist. 3132 सुधीर लातुरे, Rotary Midtown चे अध्यक्ष अमोल दडगे यांची उपस्थिती राहणार आहे.

या शिबीरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत मोफत हेल्मेट वितरण करण्यात येणार आहे. “रक्तदान करा, जीवन वाचवा! हेल्मेट घाला, जीवन सुरक्षित ठेवा!” या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिक, युवा वर्ग, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींना भव्य रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन President LSS डॉ. योगानंद दडगे, Secretary LSS डॉ. निखिल काळे, VP, LSS डॉ. अभिजित रायते, Joi. Scre. LSS डॉ. गणेश स्वामी, Trasurer, LSS डॉ. अविनाश बदने यांच्यासह लातूर सर्जिकल सोसायटी (LSS) पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे“चला, रक्तदान करून समाजासाठी योगदान देऊया! एकत्र येऊया, सुरक्षित आणि निरोगी समाज घडवूया!”

सर्जिकल सोसायटी ऑफ लातूर तर्फे “Tree Plantation Drive 2026” चे आयोजन

“आज एक झाड लावा, उद्या पृथ्वीला बरे करा” या संदेशासह पर्यावरण संवर्धनाचा संकल्पलातूर / प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि हिरवीगार लातूर घडवण्याच्या उद्देशाने सर्जिकल सोसायटी ऑफ लातूर यांच्यातर्फे “Tree Plantation Drive 2026” या वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन रविवार दि. 7 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम Plant a Tree Today, Heal the Earth Tomorrow “आज एक झाड लावा, उद्या पृथ्वीला बरे करा” अशी ठेवण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.सर्जिकल सोसायटी ऑफ लातूर तर्फे आयोजीत “Tree Plantation Drive 2026” या कार्यक्रमास MASI अध्यक्ष डॉ. आनंद कामत, वन अधिकारी धनंजय पोते, EC ASI, चेअरमन Tree Plantation Drive चे डॉ. राजेंद्र गनेरीवाल, लातूर IMA चे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, EC MASI डॉ. दिपक गुगळे, DG, Dist 3132 सुधीर लातुरे, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन अध्यक्ष अमोल दडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी लातूकर नागरिक, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि युवा वर्गाला या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन “एक हिरवीगार, निरोगी भविष्य” घडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सर्जिकल सोसायटी ऑफ लातूरचे अध्यक्ष डॉ. योगानंद दडगे, सचिव डॉ. निखिल काळे, उपाध्यक्ष डॉ. अभिजित रायते, सहसचिव डॉ. गणेश स्वामी, खजिनदार डॉ. अविनाश बदने व सर्जिकल सोसायटी ऑफ लातूरचे पदाधिकारी, सदस्यांच्यावतीने करण्यात आले आहे.वृक्षारोपणाचे वेळापत्रक व ठिकाणे:1. सकाळी 7:00 वा. – कार्निवल हॉटेल ते महापूर डिव्हायडर2. सकाळी 8:00 वा. – LIC ऑफिस रोड3. सकाळी 9:00 वा. – जुनी रेल्वे लाईन, हॉटेल ग्रँडच्या मागे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments