राष्ट्रीय सर्जन सप्ताह २०२६ निमित्त रक्तदान शिबीरास लातूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
विक्रमी रक्तदान करणारे रक्तदाते यांचा “अनसंग हिरोज ऑफ लातूर” पुरस्काराने गौरव
लातूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय सर्जन सप्ताह २०२६ निमित्त सर्जिकल सोसायटी ऑफ लातूरतर्फे गुगळे हॉस्पिटल, लातूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि. 7 रोजी करण्यात आले. या शिबीरात लातूरकरांनी उत्स्फुर्त सहभाग घेत रक्तदान केले. या शिबीरात विक्रमी रक्तदान करणारे रक्तदाते यांचा अनसंग हिरोज ऑफ लातूर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान करणाऱ्यां रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले.

रक्तदान शिबीरास खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. आनंद कामत (अध्यक्ष, MASI), डॉ. राजेंद्र गणेरीवाल (EC ASI व ASI वृक्षारोपण अभियान अध्यक्ष), डॉ. दीपक गुगळे (EC MASI), डॉ. अभिजित रायते (उपाध्यक्ष), डॉ. निखिल काळे (सचिव), डॉ. गणेश स्वामी (सहसचिव) तसेच ज्येष्ठ सर्जन डॉ. डी. एन. चिंते, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. दिनकर काळे, डॉ. पी. बी. कुलकर्णी, डॉ. विक्रम राजपूत व डॉ. अजय पुनपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) लातूरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती, खजिनदार डॉ. मन्सूर भोसले, WDW च्या अध्यक्षा डॉ. श्वेता काटकर, सचिव डॉ. आकांक्षा त्रिपाठी व डॉ. वेदांत अवस्थी यांनीही सहभाग नोंदवत सहकार्य केले.या प्रसंगी रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लातूरच्या दत्ता आपसिंगेकर (१५१ वेळा रक्तदान), अनिल डुंगरवाल (११३ वेळा रक्तदान) आणि पारस चापसी (१३८ वेळा रक्तदान) या रक्तदात्यांचा “Unsung Heroes of Latur” पुरस्कार देऊन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याचबरोबर रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत डॉक्टरांचे सहाय्यक कर्मचारी (फेलो शॅडोज) व वैद्यकीय प्रतिनिधींना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. समाजसेवा, रक्तदान व रस्ता सुरक्षा या त्रिसूत्रीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. आनंद कामत (अध्यक्ष, MASI) व डॉ. राजेंद्र गणेरीवाल (EC ASI , वृक्षारोपण अभियान अध्यक्ष) होते. डॉ. दीपक गुगळे (EC MASI), डॉ योगानंद दडगे ( अध्यक्ष) , डॉ. निखिल काळे (सचिव) ,डॉ. अभिजित रायते (उपाध्यक्ष),डॉ. गणेश स्वामी (सहसचिव) , डॉ अविनाश बदने ( कोषाध्यक्ष) तसेच ज्येष्ठ सर्जन डॉ. डी. एन. चिंते, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. अजय पुनपळे, डॉ मेघराज चावडा, डॉ बंकट फड, डॉ हळणीकर चंद्रशेखर, डॉ नितीन सरजे व उपस्थित होते.




