Homeसांस्कृतिककाल्याच्या महाप्रसादातून मनुष्याला पुण्यप्राप्ती लाभते !

काल्याच्या महाप्रसादातून मनुष्याला पुण्यप्राप्ती लाभते !

भेदरहित अवस्था प्राप्त होणेम्हणजेच हा काला होय !

मुक्तेश्वर मंदिरातील काल्याचे कीर्तनात महादेव महाराज तात्या यांचे उद्बोधक व रसाळ चिंतन …….…………

.ॲड.शाम कुलकर्णी याजकडून.

औसा. दिनांक 27 जुलै 2026 भेदरहित अवस्था प्राप्त होणे म्हणजे काला होय, आणि या काल्याच्या महाप्रसाद सेवनातून भगवान श्रीकृष्णाचे चरित्र लीला श्रवणातून पुण्यलाभ होऊन मनुष्य बरोबर सुखाला प्राप्त होऊन,जीवनमुक्त होतो असे चिंतन शांतीब्रम्ह गुरुवर्य श्री महादेव महाराज तात्या माऊली श्रीक्षेत्र चाकरवाडी यांनी मांडले.

सोमवार दिनांक 27 जुलै रोजी ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिरातील आषाढमास सततधार रुद्राभिषेक तथा अखंड हरिनाम शिवनाम सप्ताहाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनात श्री महादेव महाराज बोलत होते. सेवेकरिता श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या…..

उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम

या अभंगावर शांतीब्रह्म ह.भ.प.गुरुवर्य श्री महादेव महाराज तात्यामाऊली चाकरवाडीकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून उद्बोधक व अभ्यासपूर्ण असे चिंतन मांडले आपल्या पुष्पित वाणीतून अभंगाचे निरूपण करताना हा काला वैकुंठी दुर्लभ आहे म्हणून तर देव हा काला आपल्याला मिळण्याची अपेक्षा करतो काल्याचे कीर्तनात देवाचे चरित्र वर्णन करावे या श्रवणाने आणि भगवान गोपाळकृष्ण यांचे चरित्र उच्चारण व श्रवण केल्याने आपला आत्मउद्धार होतो महापातकाचा नाश होतो आणि आपल्यातील अंतकरणात प्रेम जागृत होऊन आपल्या हातून परमार्थिक साधना नामस्मरण सेवा घडू शकते यासाठी काल्याचेअवश्य किर्तन ऐकावे असे महादेव तात्या म्हणाले .

सर्व प्राण्याला जन्म मरण आहे पण नामस्मरण भक्ती आणि संत सेवेची संधी व अधिकार केवळ मनुष्य जातीला आहे म्हणून नामस्मरण या जीवन मुक्तीच्या मार्गावर स्थिर होण्यासाठी संत संगतीत आणि सप्ताहातील नामसंकीर्तनात यावे, जे संत अखंडपणे आपल्या मुखातून देवाचे नाम घेऊन त्याचा ध्यास स्मरण करतात आणि देहानी पूर्णतः भक्तीत तल्लीन होऊन आपल्या श्वासागणीस सेवेत समर्पित असतात त्यांच्या सहवासातून आपण उद्धरून जातो.नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त ऐसे करी ...हे संतांचे मागणे आहे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलीले जे ऋषी साच भावे वर्तया… जगाचे कल्याण संतांच्या विभूती देवतेची संत संत तेची देव यामुळे संतांच्या सहवासात मनुष्य परमार्थाच्या अवस्थेत स्थिर होतो आणि पराकोटीचा आनंद समाधान आणि सुख आपोआप प्राप्त होते असे महाराज म्हणाले.

देव जग जीव संत ही एक शृंखला आहे यामध्ये दहीभाताचा काला हा दुर्लभ कसा याचे सुंदर विवेचन केले, दहीभात काला, हरिनाम काला, आणि ब्रह्मज्ञानाचा काला, असे काल्याचे प्रकार व स्थूल सूक्ष्म कारण यातील फरक दृष्टांत कथा आधारे त्यांनी उकल करून सांगितला कर्म स्वातंत्र्य हे वैकुंठात मिळत नाही ते भूतळावरच लाभते त्यामुळे कुठलेही कुकर्म हातून घडू नये याची काळजी घेत , अन्नदान ,पंढरीची वारी अखंड नामस्मरण संतांची सेवा तीर्थक्षेत्र भ्रमण हे करावे म्हणजे विकार विहिरीत अंतकरण होऊन संत भेटीत जीवाला विदेही म्हणजेच हुंबरी अवस्था प्राप्त होऊ शकते असे श्री महादेव महाराज यांनी स्पष्ट केले. भगवान गोपाळ कृष्णाचे चरित्र अलौकिक व आघाद आहे ज्यांनी गोवर्धन पर्वत करंगळीवर पेलला,ज्यांच्या 16 हजारबायका होत्या, ज्यांनी क्षणात बाळाचे रूप आणि क्षणात तरुणरूप धारण करून अनेक लीला केल्या त्या भगवान श्रीकृष्णाची चरित्र श्रवण व उच्चारण करावे त्याच्या आचरणाच्या विचारात पडू नये कारण हे मनुष्य जीवाला पेलनारे नाही,…. गोकुळाच्या सुखा अंतपार नाही लोका… नंदाचे घराला मज्नेही गोकुळाला अशा सुंदर वचन प्रमाण अभंगाने या किर्तन श्रवणात मुक्तेश्वर भाविक भक्त तल्लीन होऊन गेला.

श्री महादेव महाराज यांनी मुक्तेश्वर मंदिरात प्रारंभी भगवान मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन कीर्तनास आरंभ केला यावेळी श्री विजयकुमार महादेव आप्पा मिटकरी यांनी सपत्नीक श्री महादेव महाराज माऊली यांचा भरपेरावा व शाल पुष्पहार अर्पण करून भव्य सत्कार कीर्तन स्थळी केला तसेच मुक्तेश्वर मंदिराचे पुजारी श्री मुन्ना स्वामी यांचाही मिटकरीआप्पांनी सपत्नीक सत्कार केला यावेळी श्री महादेव महाराज व मुक्तेश्वर न्यासाचे पदाधिकारी यांच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपाळकाला संपन्न झाला किर्तन श्रवणास औसा शहरातील व पंचक्रोशीतील हजारोंचा भक्त वर्ग व वारकरी समाज उपस्थित होता.काल्याचा प्रसाद किर्तन श्रवणास ह भ प श्री दत्तात्रय पवार गुरुजीविजयकुमार मिटकरी श्री नागेश आप्पा इळेकर.श्री.रविशंकतात्या राचट्टे, श्री.विजूआप्पा वागदरे,ह.भ.प.ऊस्तुरे गुरुजी, कोपरेविरभद्र, जयसिंग चव्हाण, सुरेश पाटील भादेकर,,सुतार माऊली, श्री मोहन महाराज जायफळकर सिद्राम आप्पा कुर्ले ,दिलीप कांबळे ,गायक मोघेकर मुक्तेश्वर मंदिर देवस्थान न्यासाचेसर्व सन्माननीय पदाधिकारी व हजारोचा श्रोता समुदाय आवर्जून उपस्थित होता काला फुटल्यानंतर हजारो भाविकांनी मुक्तेश्वराच्या महाप्रसादाचा प्रसन्न व प्रशस्त लाभ घेतला. दिवसेंदिवस या सप्ताहाला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments