रायगडावरील भव्य राज्याभिषेक सोहळ्यात लातूरकर घोलप ह्यांच्या DR Events ची छाप; लातूरकरांसाठी अभिमानाचा क्षण
लातूर, प्रतिनिधी : स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर नुकताच भव्य आणि ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या दिव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनात लातूरच्या DR Events ने महत्त्वाची भूमिका बजावत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली आकर्षक प्रकाशयोजना, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, एलईडी वॉल आणि संपूर्ण तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी DR Events ने समर्थपणे सांभाळली. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील ठिकाणी काम करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र, DR Events च्या टीमने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कामगिरी करत सोहळ्याला भव्यतेची जोड दिली.विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो शिवभक्तांनी या सोहळ्याचा अनुभव घेतला. त्यावेळी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. यामुळे लातूरच्या एका संस्थेने राज्यस्तरीय ऐतिहासिक सोहळ्यात आपला ठसा उमटवल्याची भावना व्यक्त होत आहे.

रायगडावरील या यशस्वी कामगिरीमुळे “लातूरची प्रतिभा आता राज्यभर झळकत आहे” अशी प्रतिक्रिया अनेक शिवप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्वराज्याच्या राजधानीत लातूरच्या DR Events ने केलेले काम हे संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.रायगडावर झळकला लातूरचा झेंडा…!DR Events च्या यशस्वी नियोजनामुळे लातूरकरांची छाती अभिमानाने भरून आली.

🚩जय शिवराय! जय लातूर! 🚩👏




